Join us   

व्हॅक्सिंग करण्यापूर्वी आठवणीने करा 6 गोष्टी, त्वचेवर येईल ग्लो आणि त्रासही होणार नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2022 8:02 AM

1 / 8
१. हात आणि पायाचे व्हॅक्स करणे हे आता खूपच कॉमन आहे. महिन्यातून एकदा किंवा ग्राेथ जास्त असेल तर दोनदा पार्लरमध्ये जाऊन व्हॅक्स करणाऱ्या महिलांची, तरुणींची संख्या मोठी आहे. व्हॅक्स नियमितपणे केल्यामुळे त्वचेवरील अनवॉण्टेड केस निघून जातात आणि त्वचा अधिक स्वच्छ होते, हे अगदी खरे.
2 / 8
२. पण यापेक्षा अधिक चांगला फायदा व्हॅक्स केल्यानंतर मिळावा, असे वाटत असेल तर या काही ट्रिक्स फॉलो करा. या गोष्टी केल्यामुळे त्वचेवरचे टॅनिंग निघून जाते, त्वचा उजळलेली दिसते आणि त्वचेवर एक वेगळाच ग्लो येतो.
3 / 8
३. व्हॅक्सिंग करण्याच्या एक दिवस आधी त्वचेचे स्क्रबिंग करायला विरू नका. यामुळे त्वचेवरची डेड स्किन बऱ्याच प्रमाणात निघून जाते आणि जी काही उरलेली डेड स्किन असेल ती व्हॅक्सदरम्यान निघून जाते. यामुळे व्हॅक्सिंग केल्यानंतर त्वचा आणखी स्वच्छ आणि उजळ दिसते.
4 / 8
४. व्हॅक्सिंग करण्यापुर्वी क्लिंजर व्हॅक्स देखील करावे. क्लिंजर व्हॅक्स हे एक विशिष्ट प्रकारचं ऑईल असतं. या ऑईलने त्वचेला मसाज केल्यानंतर त्वचा आणखी स्वच्छ होते आणि व्हॅक्स केल्यानंतर मुलायम चमकदार होते. ज्यांना स्ट्रॉबेरी स्किनचा त्रास आहे, त्यांनी क्लिंजर व्हॅक्स नक्की करावे.
5 / 8
५. व्हॅक्स करण्यापुर्वी स्वच्छ आंघोळ करूनच पार्लरमध्ये गेले पाहिजे. आंघोळ करताना फोम किंवा लुफा वापरून त्वचा स्वच्छ करा. यामुळे हेअर फॉलिकल्सच्या आजूबाजूला असलेली घाण स्वच्छ होईल आणि केस चटकन निघून येण्यासाठी मदत होईल.
6 / 8
६. व्हॅक्स केल्यानंतर अनेक जणांची त्वचा कोरडी झाल्यासारखी दिसते. किंवा व्हॅक्स केल्यानंतर अनेक जणांना स्ट्रॉबेरी स्किनचाही त्रास जाणवतो. त्वचेला व्यवस्थित मॉईश्चराईज न केल्यामुळे हा त्रास जाणवतो. त्यामुळे जेव्हा व्हॅक्स करणार असाल, त्याच्या २- ३ दिवस आधी व्यवस्थित बॉडी मसाज करा. यामुळे त्वचेचे योग्य पद्धतीने पोषण होईल आणि त्वचा व्हॅक्ससाठी तयार होईल.
7 / 8
७. बॉडीमसाज नंतर व्हॅक्स केल्याने त्वचेचा पोत सुधारण्यास आणि त्वचा अधिक चमकदार होण्यास निश्चितच मदत होते.
8 / 8
८. व्हॅक्स करण्याच्या एक- दोन तास आधी गरम- गरम पाण्याने आंघोळ करा. यामुळेही त्वचेवरील रंध्रे मोकळी होतात आणि व्हॅक्स करताना कमी त्रास होतो.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी