Join us

विरळ केसांसाठी बेस्ट उपाय! आठवड्यातून एकदा लावा ५ गोष्टी, केसांना मिळेल पोषणतत्व- होतील लांबसडक आणि दाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2025 17:57 IST

1 / 7
आपल्यापैकी अनेकांना लांब आणि जाडसर केस हवे असतात. परंतु, पुरेसा आहार, ताणतणाव, अपुरी झोप आणि पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केसांची वाढ होत नाही. इतकेच नाही तर केस गळून विरळ होतात. (Hair fall solution home remedies)
2 / 7
अधिक रासायनिक घटक केसांसाठी वापरल्याने केस खूप कमकुवत आणि पातळ होतात. केस लांब आणि जाड करण्यासाठी आपण विविध उपाय करतो. पण काही घरगुती उपाय वापरल्यास केसगळती तर थांबेल आणि केस जाड होण्यास मदत होईल. (How to stop hair fall naturally)
3 / 7
आपले केस लांब आणि जाडसर करण्यासाठी आपण भृंगराज तेल वापरु शकतो. भृंगराज तेलाने आठवड्यातून एक दिवस केसांना मालिश करा. एक तासानंतर केस शाम्पूने धुवा. केस मजबूत होण्यास मदत होईल. (What to apply for thick hair)
4 / 7
नारळाचे तेल केसांसाठी फायदेशीर आहे. नारळाच्या तेलाने केसांची मालिश करु शकता. यामुळे टाळूचे रक्ताभिसरण सुधारते. केस मुळापासून मजबूत आणि दाटसर होतात.
5 / 7
जर आपले केस पातळ आणि कमकुवत असतील तर अंड्याचा हेअर मास्क वापरा. २ अंडी फेटून केसांना आणि टाळूला लावा. अर्धा तासाने केस स्वच्छ धुवा. यामुळे केसांना पुरेसे पोषण मिळेल.
6 / 7
मेथी दाणे आपल्या केसांना अधिक मजबूत बनवण्याचे काम करतात. मेथीच्या बियांना रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी त्याची पेस्ट करुन केसांना आणि टाळूला लावा. अर्धा तासाने केस धुवा, असे आठवड्यातून एकदा करा.
7 / 7
त्वचेसह केसांसाठी देखील कोरफड फायदेशीर आहे. कोरफडीचा गर घेऊन तो केसांना लावा. यामुळे केस मजबूत आणि जाड होतील. कोरफडीच्या गरामुळे केस मॉइश्चरायझिंग होतील.
टॅग्स : ब्यूटी टिप्सकेसांची काळजी