1 / 5मोठ्या व्यक्तींच्या डोक्यात जसा कोंडा होतो तसाच कोंडा शाळेत जाणाऱ्या मुलांच्या डोक्यातही होतो. केसातल्या कोंड्यामुळे मग ते बिचारे सारखं डोकं खाजवत बसतात.2 / 5लहान मुलांच्या डोक्यात जेव्हा कोंडा होतो, तेव्हा तो कमी करण्यासाठी काय उपाय करावे, हे समजत नाही. कारण मुलांची त्वचा नाजूक असल्याने कोणताही केमिकल्स असणारा ॲण्टी डॅन्ड्रफ शाम्पू त्यांच्या केसांवर लावायला नको वाटतो.3 / 5त्यामुळेच आता जावेद हबीब यांनी सांगितला हा एक सोपा उपाय करून पाहा. हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये खोबरेल तेल घ्या.(best home remedy for dandruff in kids hair by javed habib)4 / 5जेवढं खोबरेल तेल घेतलं असेल तेवढाच त्यात लिंबाचा रस टाका. दोन्ही पदार्थ एकमेकांत चांगले मिसळले की मग ते केसांच्या टोकाशी लावा.5 / 5यानंतर साधारण १५ ते २० मिनिटांनी त्यांचा नेहमीचा कोणताही माईल्ड शाम्पू वापरून केस धुवून टाका. आठवड्यातून एकदा हा उपाय केला तरी कोंडा बऱ्याच प्रमाणात कमी झालेला जाणवेल.