1 / 8आठवड्यातून एकदा किंवा दोन वेळा बहुतांश लोक केसांना मालिश करतात आणि त्यानंतर काही तासाने शाम्पू करून केस धुतात.2 / 8आता केसांना तेल लावण्यासाठी कोणतंही एकाच प्रकारचं तेल लावण्यापेक्षा जर तुम्ही काही वेगवेगळे तेल एकत्र करून डोक्याला मालिश केल्यास केस तर चांगले होतातच पण त्यामुळे अनेक शारिरीक आणि मानसिक फायदेही होतात. त्यासाठी घरगुती पद्धतीने तेल कसं तयार करायचं ते पाहूया..(best home made hair oil combinations for healthy hair)3 / 8हे तेल तयार करण्यासाठी १०० मिली खोबरेल तेल घ्या. खोबरेल तेल हा तेलासाठी एक उत्तम बेस असून केसांना मॉईश्चराईज करण्यासाठी ते उपयुक्त ठरतं.4 / 8खोबरेल तेलामध्ये ५० ते ६० थेंब रोजमेरी तेल घाला. रोजमेरी तेलामुळे केसांची वाढ तर होतेच, पण डोकं शांत होण्यास, रात्री शांत झोप लागण्यासही मदत होते.5 / 8आता या तेलमध्येच १ टीस्पून बदाम तेल घाला. बदाम तेलामुळे रक्ताभिसरण चांगले होऊन केसांची मुळं पक्की होण्यास मदत होते. त्यामुळे केस गळण्याचं प्रमाण कमी होतं.6 / 8आता या तेलामध्ये १ चमचा आवळ्याचं तेल घाला. आवळ्याच्या तेलामुळे केस कमी वयात पांढरे होत नाहीत. 7 / 8तसेच आता सगळ्यात शेवटी त्यामध्ये १ टीस्पून अक्रोड तेल घाला. अक्रोडाच्या तेलामुळे मन शांत होतं. तसेच एकाग्रता वाढण्यासही मदत होते. वरील सगळे प्रकारचे तेल एकत्र करा आणि त्याने केसांना मालिश करा.8 / 8आठवड्यातून एकदा तरी हा उपाय करावा. यामुळे केसांना आणि आरोग्याला अनेक लाभ होतील, अशी माहिती डॉ. मनिषा यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.