फक्त ३ पदार्थ एकत्र करून केसांना लावा- रखरखीत, कोरड्या झालेल्या केसांवर येईल छान चमक
Updated:October 15, 2025 15:13 IST2025-10-15T15:08:17+5:302025-10-15T15:13:14+5:30

कधी कधी केसांमधलं माॅईश्चर कमी झालं की ते खूप डल, ड्राय दिसू लागतात. अगदी झाडूसारखा कोरडेपणा त्यांच्यात येतो.
त्यामुळे केसांना छान मॉईश्चराईज करणं गरजेचं असतं जेणेकरून त्यांची कमी झालेली चमक पुन्हा येईल आणि ते छान सिल्की, चमकदार होतील.
यासाठी आपण पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा करू शकतो. पण त्यावर भरपूर पैसे आणि वेळ खर्च करण्यापेक्षा घरच्याघरी एक सोपा उपाय करून पाहा. हा उपाय केल्यामुळे अगदी कमीतकमी पैशांत तुमच्या केसांवर छान चमक येईल.
हा उपाय करण्यासाठी कोरफडीचा ताजा गर काढून घ्या. साधारण २ ते ३ टेबलस्पून एवढा तो गर असावा. तुमच्या केसांच्या लांबीनुसार हे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता.
आता यामध्ये २ टेबलस्पून दही घाला. दह्यामुळेही केसांना छान पोषण मिळून त्यांच्यावर चमक येण्यास मदत होते.
आता या मिश्रणामध्येच १ टी स्पून खोबरेल तेल घाला आणि हे सगळे पदार्थ मिक्सरमधून बारीक करून त्याची एक पातळ पेस्ट तयार करा.
ही पेस्ट केसांना लावा आणि साधारणपणे अर्ध्या ते पाऊण तासाने केस धुवून टाका. केसांवर छान चमक येईल. हा उपाय mirror_salon_academy_nashik या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.