Join us
Daily Top 2 Weekly Top 5

केस धुतल्यानंतर 'हा' पदार्थ लावा! जावेद हबीब सांगतात स्ट्रेटनिंग न करताही केस होतील सिल्की, मुलायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2024 14:52 IST

1 / 5
काही जणींचे केस खूपच राठ, चिकट असतात. त्यालाच आपण फ्रिझी हेअर म्हणतो. असे केस अजिबातच व्यवस्थित दिसत नाहीत. ते धड मोकळेही सोडता येत नाहीत.
2 / 5
म्हणूनच अशा राठ, चिकट किंवा फ्रिझी केसांना स्ट्रेटनिंग न करताही छान सिल्की, मुलायम करायचं असेल तर त्यासाठी कोणता उपाय करावा, याविषयीची माहिती ब्यूटी एक्सपर्ट जावेद हबीब यांनी दिसली आहे.
3 / 5
ते म्हणतात की जर तुमचे केस खूप चिकट, राठ असतील तर ते सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे शाम्पू करून स्वच्छ धुवून घ्या.
4 / 5
केस धुतल्यानंतर त्याच्यावर प्लेन क्लब सोडा plain club soda घाला आणि त्याने केस धुवा. हा सोडा केसांच्या मुळाशी तसेच केसांच्या लांबीवरही लागू द्या.
5 / 5
त्यानंतर पुन्हा ५ मिनिटांनी केस नुसत्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय केल्यावर जेव्हा तुम्ही केस धुवाल तेव्हा त्यांच्यामध्ये खूपच चांगला फरक झालेला दिसून येईल. तुमचे राठ, चिकट केस अगदी मस्त सिल्की आणि मुलायम झालेले दिसतील.
टॅग्स : ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी