चेहऱ्यावर शीट मास्क लावण्याची योग्य पद्धत कोणती? तज्ज्ञांनी सांगितले ४ उपाय, ब्लॅकहेड्स - पिंपल्स होतील कमी

Updated:June 4, 2025 09:05 IST2025-06-04T09:00:00+5:302025-06-04T09:05:04+5:30

how to use sheet mask on face: sheet mask beauty tips: skincare hacks for glowing skin: योग्य पद्धतीने चेहऱ्यावर शीट मास्क कसा लावावा पाहूया.

चेहऱ्यावर शीट मास्क लावण्याची योग्य पद्धत कोणती? तज्ज्ञांनी सांगितले ४ उपाय, ब्लॅकहेड्स - पिंपल्स होतील कमी

सध्या त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण चेहऱ्यावर अनेक गोष्टी लावतो, त्यातील एक शीट मास्क. शीट मास्क हा चेहरा स्वच्छ ठेवत नाही तर कोरड्या त्वचेला हायड्रेट करण्याचे काम देखील करते. (how to use sheet mask on face)

चेहऱ्यावर शीट मास्क लावण्याची योग्य पद्धत कोणती? तज्ज्ञांनी सांगितले ४ उपाय, ब्लॅकहेड्स - पिंपल्स होतील कमी

चेहऱ्यावर चुकीच्या पद्धतीने शीट मास्क लावल्यास त्याचे फायदे आपल्याला होत नाही. तसेच चेहरा काळपट दिसू लागतो आणि पिंपल्स येण्याची शक्यता देखील वाढते. योग्य पद्धतीने चेहऱ्यावर शीट मास्क कसा लावावा पाहूया. (sheet mask beauty tips)

चेहऱ्यावर शीट मास्क लावण्याची योग्य पद्धत कोणती? तज्ज्ञांनी सांगितले ४ उपाय, ब्लॅकहेड्स - पिंपल्स होतील कमी

मास्क चेहऱ्यावर लावण्यापूर्वी तो फ्रीजमध्ये ठेवावा. कोल्ड शीट मास्क चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो. तसेच रक्ताभिसरण सुधारते. यामुळे चेहऱ्यावरील सूज कमी होऊन त्वचा अधिक निरोगी होते.

चेहऱ्यावर शीट मास्क लावण्याची योग्य पद्धत कोणती? तज्ज्ञांनी सांगितले ४ उपाय, ब्लॅकहेड्स - पिंपल्स होतील कमी

शीट मास्क लावण्यापूर्वी त्वचा स्वच्छ असायला हवी. फेसवॉशने चेहरा स्वच्छ करा, यामुळे घाण, अतिरिक्त तेल आणि मेकअप निघून जाण्यास मदत होईल. यानंतर शीट मास्क लावा. मास्कमधील सिरम त्वचा चांगल्या पद्धतीने शोषून घेते, ज्यामुळे चेहरा अधिक ग्लो होतो.

चेहऱ्यावर शीट मास्क लावण्याची योग्य पद्धत कोणती? तज्ज्ञांनी सांगितले ४ उपाय, ब्लॅकहेड्स - पिंपल्स होतील कमी

चेहऱ्यावर शीट मास्क लावल्यानंतर त्या पॉकेटमध्ये सीरमसारखा चिकट पदार्थ हाताला चिकटतो. अशावेळी तो मान, हात किंवा कोपरांवर लावा. ज्यामुळे काळपटलेली त्वचा स्वच्छ होण्यास मदत होईल.

चेहऱ्यावर शीट मास्क लावण्याची योग्य पद्धत कोणती? तज्ज्ञांनी सांगितले ४ उपाय, ब्लॅकहेड्स - पिंपल्स होतील कमी

त्वचेच्या प्रकारानुसार विविध पद्धतीचे शीट मास्क मिळतात. आपली त्वचा कोरडी असेल तर हायल्युरोनिक ॲसिड असलेला मास्क निवडा. पिंपल्स असतील तर टी ट्री ऑइलची शीट निवडा. डाग आणि त्वचा चमकवण्यासाठी व्हिटॅमिन सी चांगला पर्याय आहे.

चेहऱ्यावर शीट मास्क लावण्याची योग्य पद्धत कोणती? तज्ज्ञांनी सांगितले ४ उपाय, ब्लॅकहेड्स - पिंपल्स होतील कमी

शीट मास्क हा १५ ते २० मिनिटे त्वचेवर ठेवावा. त्यानंतर हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करावा. यामुळे त्वचा गुळगुळीत आणि स्वच्छ होण्यास मदत होईल.