तुम्ही ‘हे’ पदार्थ रोज खाता, म्हणून चेहऱ्यावर येतात मुरुम-पुटकुळ्या-डागही जाता जात नाहीत
Updated:May 15, 2025 17:52 IST2025-05-15T17:49:25+5:302025-05-15T17:52:27+5:30
Foods that cause pimples: Avoid these foods for clear skin: Daily foods that trigger acne: त्वचेची योग्य काळजी न घेतल्याने आणि हार्मोनल बदलांमुळे मुरुमांची समस्या वाढते.

आपल्या प्रत्येकाच्या त्वचेचवर मुरुमे-पिंपल्स येतात ही समस्या सामान्य वाटत असली तरी काही काळाने चेहरा आपला खराब दिसू लागतो. त्वचेच्या छिद्रांमध्ये अडथळा निर्माण झाल्याने बॅक्टेरिया वाढतात.
त्वचेची योग्य काळजी न घेतल्याने आणि हार्मोनल बदलांमुळे मुरुमांची समस्या वाढते. तसेच आपला आहार कसा असतो याचा परिणाम देखील आपल्या चेहऱ्यावर होतो.
दूध आणि डेअरी प्रोडक्ट्स खाल्याने आपल्या त्वचेवर मुरुमे येतात. दुधात अमीनो आम्लाचे घटक असतात जे त्वचेवर मुरुमे येण्यास मदत करतात. त्यामुळे आहारात दुग्धजन्य पदार्थाचे प्रमाण कमी असायला हवे.
साखर आणि कार्बोहायड्रेट्स असणारे पदार्थ मुरुमांच्या समस्या वाढण्यास कारणीभूत असतात. या पदार्थांमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. यामुळे मुरुमे येऊ लागतात.
चिप्स, नुडल्ससारख्या पदार्थांमुळे मुरुमांची समस्या वाढते. जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरात हार्मोनल असंतुलित होते. ज्यामुळे चेहरा खराब होऊन पिंपल्स येतात.
सतत गोडाचे पदार्थ, चॉकलेट्स खाल्ल्याने शरीरात साखरेचे प्रमाण वाढते ज्यामुळे त्वचेतील कोलेजन कमी होऊन मुरुमांची समस्या उद्भवते.
चेहऱ्यावरील मुरुमे-पिंपल्स कमी करण्यासाठी आपण भरपूर पाणी प्यायला हवे. तसेच आहारात पौष्टिक पदार्थ, कार्बोहायड्रेट, प्रथिने, फायबर, जीवनसत्त्व असणाऱ्या पदार्थांचा समावेश करा.