स्वयंपाकघरातील ५ गोष्टी करतात चेहऱ्यावर जादू! रॅशेस-मुरुम-पिंग्मेंटेशन सगळंच होईल कमी- त्वचा उजळेल
Updated:May 14, 2025 16:55 IST2025-05-14T16:49:36+5:302025-05-14T16:55:34+5:30
Kitchen items for clear skin: Home remedies for acne and pigmentation: Natural skincare from kitchen: रॅशेस, मुरुमे, पिंग्मेंटेशनची समस्या कमी करण्यासाठी हे घरगुती उपाय ट्राय करुन पाहा.

ऋतू कोणताही असला तरी त्वचेच्या समस्या काही संपत नाही. पिंपल्स, डार्क सर्कल्स, रॅशेसच्या समस्या कोणत्याही ऋतूमध्ये आपल्याला सतावतात. ज्यामुळे त्वचेचे सौंदर्य बिघडते. (Kitchen items for clear skin)
चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण अनेक महागडे उत्पादने चेहऱ्यावर लावतो. परंतु, स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ आहे ज्याचा आपण त्वचेवर उपयोग करु शकतो.
रॅशेस, मुरुमे, पिंग्मेंटेशनची समस्या कमी करण्यासाठी हे घरगुती उपाय ट्राय करुन पाहा. (Home remedies for acne and pigmentation)
चेहरा स्क्रब करण्यासाठी हळद एक चांगला पर्याय आहे. यामध्ये दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंटचे गुणधर्म आहेत. याचा उपयोग केल्याने चेहऱ्याला चमक येते.
कॉफी हे त्वचेसाठी चांगला स्क्रब मानला जाते. याचा उपयोग केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग आणि सूज कमी होण्यास मदत होते. तसेच त्वचेचा पोत सुधारतो.
त्वचेला एक्सफोलिएंट करण्यासाठी साखर फायदेशीर आहे. साखर चेहऱ्यावरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करतात. ज्यामुळे आपली त्वचा नितळ होते.
ओट्स हे फक्त खाण्यासाठी नाहीतर त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. याचा स्क्रब आपल्याला त्वचेला जळजळीपासून शांत करते.
लिंबाचा रस चेहऱ्यासाठी गुणकारी मानला जातो. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. जे आपल्या त्वचेला उजळवण्यास मदत करते. यामुळे मुरुमे आणि डाग कमी होतात.
दालचिनीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे मुरुमांच्या समस्यांशी लढण्यास मदत करतात. यामुळे आपले रक्ताभिसरण सुधारून त्वचेला चमक देते.