Join us   

काही मिनिटांतच पिंपल्स दबून जातील, स्वयंपाक घरातले ३ पदार्थ वापरून करा आयुर्वेदिक उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2024 10:42 AM

1 / 6
चेहऱ्यावर पिंपल्स आले की चेहऱ्याचं सगळं सौंदर्यच कमी होतं. बऱ्याचदा तर आपल्याला एखाद्या खास कार्यक्रमासाठी जायचं असतं. पण अशावेळी नेमके चेहऱ्यावर पिंपल्स येतात आणि आपला मूड जातो.
2 / 6
म्हणूनच आता चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी करण्यासाठी हे काही आयुर्वेदिक उपाय पाहून घ्या. हे उपाय आयुर्वेद तज्ज्ञांनी chitchatrajlaviandrajeshwarisachdev या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत. हे काही उपाय केल्यामुळे काही मिनिटांतच आपल्याला पिंपल्स दबून गेलेले दिसतील.
3 / 6
यामध्ये डॉक्टरांनी ३ उपाय सांगितले आहेत. त्यापैकी तुम्हाला जो सोपा वाटतो तो करून पाहा.
4 / 6
सगळ्यात पहिला उपाय म्हणजे धनेपावडर दुधामध्ये कालवा आणि हे मिश्रण पिंपल्सवर लावा. १० मिनिटांनी चेहरा धुवून टाका.
5 / 6
दुसरा उपाय म्हणजे जायफळ दूधात उगाळून घ्या आणि जिथे पिंपल्स आहेत तिथे लावा. १० मिनिटांनी चेहरा धुवून टाका.
6 / 6
तिसरा उपाय करण्यासाठी आपल्याला मिरेपूड वापरायची आहे. मिरेपूड आणि दूध एकत्र करा. हे मिश्रण पिंपल्सवर लावा आणि १० मिनिटांनी चेहरा धुवून टाका.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीघरगुती उपाय