आयब्रो- चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी रेझर वापरताय? ५ चुका - चेहऱ्याचं सौंदर्य होईल खराब..

Updated:April 10, 2025 17:50 IST2025-04-10T17:48:01+5:302025-04-10T17:50:52+5:30

Facial razor mistakes: Common shaving mistakes for women: How to shave face with razor safely: Eyebrow razor tips: रेझरचा वापर करताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

आयब्रो- चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी रेझर वापरताय? ५ चुका - चेहऱ्याचं सौंदर्य होईल खराब..

आपल्या सौंदर्याची खरी ओळख कोण दाखवत असेल तर तो आपला चेहरा. चेहरा सुंदर आणि तजेलदार दिसावा यासाठी आपण त्यावर अनेक महागड्या उत्पादनांचा वापर करतो. परंतु, चेहऱ्यावर, ओठांच्या वरच्या भागांवर हलके पण लहान केस पाहायला मिळतात. (Facial razor mistakes)

आयब्रो- चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी रेझर वापरताय? ५ चुका - चेहऱ्याचं सौंदर्य होईल खराब..

डॉक्टरांच्या मते हे केस हार्मोन्स असंतुलित झाल्यामुळे येतात. केस काढण्यासाठी आपण वॅक्सिंगची मदत घेतो. आयब्रोजवळचे केस काढण्यासाठी आपण थ्रेडिंग करतो. वॅक्सिंग-थ्रेडिंगमुळे आपल्याला त्रास सहन करावा लागतो. चेहऱ्याची आग-जळजळ होते. अशावेळी रेझरचा वापर करतो. पण याचा वापर करताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. (Common shaving mistakes for women)

आयब्रो- चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी रेझर वापरताय? ५ चुका - चेहऱ्याचं सौंदर्य होईल खराब..

अगदी जलद गतीने किंवा घाईमध्ये रेझरचा वापर करु नका. यामुळे त्वचेवर कट किंवा पुरळ येऊ शकतात. ज्या ठिकाणी रेझर वापरायचा आहे तिथे बारीक आणि काळजीपूर्वकपणे रेझर वापरा.

आयब्रो- चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी रेझर वापरताय? ५ चुका - चेहऱ्याचं सौंदर्य होईल खराब..

रेझर वापरण्यापूर्वी त्वचा स्वच्छ करा. त्यानंतर मॉइश्चरायझर किंवा सीरम लावा. ज्यामुळे त्वचेवरील नको असणारे केस लगेच काढण्यास मदत होईल. त्वचा कोरडी असेल तर रेझर लागण्याची शक्यता अधिक आहे.

आयब्रो- चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी रेझर वापरताय? ५ चुका - चेहऱ्याचं सौंदर्य होईल खराब..

आपल्या चेहऱ्यावर मुरुमे किंवा पुरळ असेल तर त्या जागी रेझर वापरणे टाळा. यामुळे मुरुमांमध्ये अधिक वाढ होईल, तसेच त्वचेवर डाग देखील येऊ शकतात.

आयब्रो- चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी रेझर वापरताय? ५ चुका - चेहऱ्याचं सौंदर्य होईल खराब..

रेझर वापरल्यानंतर त्वचा अधिक संवेदनशील होते. अशावेळी त्वचेवर फाउंडेशन, कन्सीलर किंवा मेकअपचा वापर करु नका. यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. तसेच त्वचा लालसर होऊ शकते.

आयब्रो- चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी रेझर वापरताय? ५ चुका - चेहऱ्याचं सौंदर्य होईल खराब..

रेझरचा वापर नेहमी चेहऱ्यावर वरपासून खालपर्यंत करा, अर्थात विरुद्ध दिशेने करावा. यामुळे केस लवकर वाढत नाही. विरुद्ध दिशेने रेझर वापरल्यास त्वचेची जळजळ होऊ शकते.