डोळ्यांभोवती, कपाळावर बारीक सुरकुत्या दिसू लागल्या? 'या' पद्धतीने ज्येष्ठमध लावा- १० वर्षांनी तरुण दिसाल
Updated:March 13, 2026 09:40 IST2026-03-13T09:36:22+5:302026-03-13T09:40:02+5:30

कामाचा वाढलेला ताण, ऊन, प्रदुषण, अपुरा आहार यामुळे हल्ली स्किन केअर समस्याही कमी वयातच डोकं वर काढायला लागल्या आहेत..
त्यामुळेच तर हल्ली तिशी ओलांडलेल्या कित्येक जणींच्या चेहऱ्यावर फाईन लाईन्स दिसायला लागतात.
चेहऱ्यावर दिसणारं हे सुरकुत्यांचं जाळं कमी वयातच वाढू द्यायचं नसेल तर पुढे सांगितलेला एक सोपा उपाय लगेचच करायला सुरुवात करा.
हा उपाय करण्यासाठी १ कप पाणी घ्या. त्यामध्ये १ इंच ज्येष्ठमधाचा तुकडा बारीक ठेचून घाला.
आता त्याच पाण्यात १ चमचा जवस घाला. जवस आणि ज्येष्ठमध हे दोन्ही पदार्थ तुमच्या त्वचेला तारुण्य देतील...
पाणी ४ ते ५ मिनिटे चांगलं उकळून घेतल्यानंतर गॅस बंद करा. पाणी गाळून घ्या. आणि थंड झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा ग्लिसरीन घाला. ग्लिसरीनमुळे त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत होते.
आता यानंतर त्या पाण्यात अर्धा चमचा बदाम तेल घाला. बदाम तेलही त्वचेसाठी अतिशय फायदेशीर ठरतं.
रोज रात्री झोपण्यापुर्वी हे सिरम चेहऱ्याला लावून हलक्या हाताने मालिश करा. बघा काही दिवस हा उपाय केल्यास अकाली आलेल्या सुरकुत्या गायब होतील आणि तुम्ही १० वर्षांनी तरुण दिसू लागाल.