उन्हाळ्यात 'या' पद्धतीने चेहऱ्यावर लावा मुलतानी माती, त्वचेला मिळेल गारवा, जळजळ-टॅनिंग होईल कमी
Updated:May 1, 2025 18:43 IST2025-05-01T18:40:59+5:302025-05-01T18:43:33+5:30
Multani mitti for glowing skin: Multani mitti for summer skincare: उन्हाळ्यात चेहऱ्याला थंडावा मिळावा यासाठी मुलातानी माती कशा पद्धतीने लावायला हवी पाहूया.

उन्हाळ्यात आपली त्वचा घाम आणि धुळीमुळे निर्जीव आणि चिकट होते. तसेच चेहऱ्यावर टॅनिंग आणि रॅशेस देखील येतात.(Multani mitti for glowing skin)
रखरखत्या उन्हामुळे चेहरा काळा पडतो. अशावेळी चेहऱ्याला गारवा देण्यासाठी आपण मुलतानी मातीचा वापर करु शकतो. ज्यामुळे त्वचा थंडच नाही तर टॅनिंग, पिंपल्स आणि तेलकट त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळेल. (Multani mitti for summer skincare)
उन्हाळ्यात चेहऱ्याला थंडावा मिळावा यासाठी मुलतानी माती कशा पद्धतीने लावायला हवी पाहूया. (Benefits of multani mitti on face)
मुलतानी मातीमध्ये गुलाब पाणी घालून त्याची पेस्ट तयार करा. हे चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटे लावा आणि थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावर होणारी जळजळ कमी होईल.
त्वचा संवेदनशील असेल तर मुलतानी मातीमध्ये कोरफडीचा गर मिक्स करुन चेहऱ्यावर लावा. ज्यामुळे चेहऱ्याला थंडावाच नाही पुरळांपासून आराम मिळेल.
टॅनिंग दूर करण्यासाठी मुलतानी माती, दही आणि लिंबाचे काही थेंब मिक्स करुन चेहऱ्यावर लावा. ज्यामुळे चेहऱ्यावरील टॅनिंग दूर होऊन तो चमकू लागेल.
मुलतानी माती फक्त चेहऱ्यावरच नाही तर हात-पायांना देखील आपण लावू शकतो. आंघोळीपूर्वी लावल्याने शरीर थंड होते आणि त्वचा स्वच्छ होते.