वयाच्या चाळीशीतही दिसाल तरुण! ५ पदार्थ वाढवेल त्वचेचे सौंदर्य, सुरकुत्या-डार्क सर्कलच्या समस्या कमी
Updated:May 4, 2025 18:05 IST2025-05-04T18:00:00+5:302025-05-04T18:05:01+5:30

वय ओलांडू लागले की चेहऱ्यावर सुरकुत्या-डार्क सर्कलची समस्या सतावू लागते. या काळात त्वचा घट्ट होण्याऐवजी ती सैल पडते. ज्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य बिघडते. (Skin care after 40)
त्वचेतील कोलजन कमी झाल्यावर वाढत्या वयानुसार आपले तरुणपण कमी होऊ लागते. कोलजनमुळे आपली त्वचा घट्ट आणि तरुण राहते. (Foods to reduce wrinkles)
जर आपणही चाळीशीत पदार्पण करत असू तर नैसर्गिकरित्या कोलेजनचे उत्पादन वाढवणारे पदार्थ आहारात असायला हवे यामुळे त्वचेचे सौंदर्य कायम टिकून राहते. (Collagen boosting foods)
सोया उत्पादनांमध्ये टोफू आणि सोया दूध हे फायदेशीर आहे. यामुळे वाढत्या वयात येणारे अकाली वृद्धत्व रोखण्याचे गुणधर्म असतात.
बदाम हे कोलेजनसाठी चांगले आहे. यामध्ये व्हिटॅमिन ई असते जे त्वचेचे संरक्षण करते आणि त्वचा दुरुस्त करण्याचे काम करते.
व्हिटॅमिन सी मध्ये कोलेजन उत्पादनासाठी आवश्यक असणारे पोषक तत्व आढळतात. त्यासाठी आहारात संत्री, मोसंबी, लिंबू आणि शिमला मिरची खा.
चिकन आणि मांसमध्ये असणारे घटक कोलेजन वाढवण्यास मदत करतात. चिकनचा रस्सा हा कोलेजनचा पॉवर हाऊस मानला जातो.
सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने कोलेजन संश्लेषणात मदत करते. यामुळे पचनक्रिया सुधारते.