कतरिनाचे साडीतील ८ सिंपल - स्टायलिश लूक, पार्टी असो या फंक्शन, दिसाल हटके
Updated:November 18, 2022 19:18 IST2022-11-17T23:26:32+5:302022-11-18T19:18:45+5:30
Katrina Kaif Saree look साडीतल्या लुकमध्ये कतरिना अधिक खुलून दिसते. साडीतल्या विविध पॅटर्नमध्ये ती एक हटके आणि स्टायलिश टच देते.

बाॅलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ ही नेहमी आपल्या लुक्समुळे चर्चेत असते. तिचे घायाळ करणारे लूक सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात. वेस्टर्न असो या ट्रेडिशनल तिला प्रत्येक लूक सूट करतो. तिच्या लुकमध्ये एक स्टायलिश अंदाज असतो. जो तिला अधिक सुंदर बनवतो. ट्रेडिशनल लूक अथवा साडीत ती मोहक आणि सुंदर दिसते. साडीतल्या विविध पॅटर्नमध्ये ती एक हटके आणि स्टायलिश टच देते.
पिंक साडीत ती अधिक खुलून दिसत आहे. तिने या साडीत कमरेवर एक बेल्ट लावला आहे. हा बेल्ट स्टायलिश दिसत असून, तिची साडी या बेल्टमुळे मॅनेजेबल राहिली आहे. आपण देखील अशा साडीवर बेल्ट लावून एक हटके लूक मिळवू शकता.
आपली साडी जर भरगच्च जरीने भरलेली असेल, तर डिझायनर ब्लाऊज न शिवता ट्रेंडिंग शिवा. यात कतरिनाने मोठ्या बाह्यांचा ब्लाऊज शिवला आहे. आपण देखील असा ब्लाऊज ट्राय करू शकता.
आजही महिला वर्गाची पसंती सिंपल साडीला दिसून येते. यात कतरिनाने पांढऱ्या रंगाची साडी नेसली असून, नॉर्मल मेकअप ठेवला आहे. आपण हा लूक कोणत्याही कार्यात परिधान करू शकता.
सिक्विन साडी प्रत्येक पार्टी अथवा कार्यात उठून दिसते. यात कतरिनाने सिक्विन साडी नेसली आहे आणि नॉर्मल मेकअप केला आहे. जो तिच्यावर खूप सूट करत आहे.
वधूवर लाल रंग सुंदर दिसतो, परंतु लाल रंगाची भारी साडी नेसण्याऐवजी कतरिनाने यात नेसलेली साडी आपल्यला स्टायलिश लुक देईल. या प्रिंटेड लाल साडीत आपल्यला आरामदायक वाटेल. या साडीवर निळ्या रंगाचा ब्लाऊज अधिक सूट करेल.
कतरिना या सिल्वर साडीत खूप क्युट आणि सुंदर दिसत आहे. ही साडी नेटवर तयार करण्यात आली असून, त्यावर शिमरी वर्क करण्यात आला आहे.
कतरिनाने नेसलेली ही लाइट शेडची साडी आपल्यला स्टायलिश लूक देईल. तिचा यात नो मेकअप लूक असून, तिचा सिंपल अंदाज आपण देखील ट्राय करू शकता.