Join us   

नथीचा नखरा.. गुढी पाडव्याला नथ घालायची आहे? पाहा नथींचे ८ डिझाइन्स- सुंदर- पारंपरिक आणि मॉर्डर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2023 6:35 PM

1 / 9
सणासुदीच्या काळात महिला पारंपारिक पेहराव परिधान करायला प्राधान्य देतात. नऊवारी साडीवर मोत्याची नथ आवर्जून घालतात. नथ म्हणजे एक अप्रतिम पारंपरिक दागिना आहे. महाराष्ट्रीयन नथींमध्ये पेशवेकालीन नथ, मराठा नथ, ब्राम्हणी नथ, कारवारी नथ, बानू नथ असे विविध प्रकार आढळतात. मध्यंतरी नथीचा नखरा हा ट्रेण्ड खूप चर्चेत आला होता. नथीमध्ये देखील विविध डिझाइन्स बाजारात आले आहेत. या गुढीपाडव्याला नथ घालणार असाल तर हे पाहा काही ट्रेण्डी डिझाइन्स(8 Nath Designs For The Traditional Maharashtrian Look).
2 / 9
पूर्वपरंपरागत चालत आलेली नथ म्हणजे ब्राह्मणी मोती नथ. कोणत्याही प्रकारच्या चेहऱ्यावर ही नथ शोभून दिसते. या नथीसह आपण मोत्याचे दागिने घातलेत तर आणखी शोभा वाढेल. ही नथ तुम्हाला अनेक डिझाईन्समध्ये मिळतील. या नथीची ओळख खड्यानेच होते. शिवाय ही नथ इतर नथींपेक्षा आकाराने थोडी मोठी असते.
3 / 9
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील परंपरा ही कारवारी नथ दर्शवते. ही नथ थोडीफार बानू नथीप्रमाणेच दिसते. पण त्यामध्ये थोडीशी दाक्षिणात्य झलक असते. कारवार या शहरावरून या नथीला नाव देण्यात आलं आहे. ही नथ सोनं, मोती, बसरा मोती यांनी तयार करण्यात येते.
4 / 9
नथ ही तिच्या पारंपरिकता व त्यावरील नाजूक कामासाठी ओळखली जाते. या नथी आकाराने बऱ्यापैकी लहान असतात. तसंच साडीवर कोल्हापुरी साज आणि मोत्यांच्या दागिन्यांसह ही नथ परिधान केल्यास सौंदर्य अधिक खुलून दिसतं.
5 / 9
पाचू नथ सहसा दिसत नाही. पण काही जणांना पाचू घालयला आवडतं. पाचूची नथ ही एमराल्ड नथ म्हणूनही ओळखली जाते. या नथीचा आकार लहान असतो, मात्र लखाखणारा पाचू अधिक लक्ष वेधून घेतो. यामध्ये कोणत्याही प्रकारचे रंगबेरंगी खडे अथवा मोती नसतात. त्यामुळे ही नथ अतिशय रॉयल दिसते.
6 / 9
हिरा म्हणजे प्रत्येक महिलेचा आवडता विषय. ही नथ मुख्यत्वे राजस्थानी आणि मारवाडी विवाहित महिलांमध्ये घालण्याची पद्धत आहे. ही नथ लग्नामध्ये खूपच सुंदर दिसते. याशिवाय आपण भरजरी लेहंग्यासोबत ही जडावू हिऱ्यांची नथ घालू शकता.
7 / 9
लाल आणि हिरव्या रंगाच्या खड्याची ही नथ सध्या ट्रेंडमध्ये आहे. ही नथ पुणेरी नथ म्हणूनही ओळखली जाते. या नथीमध्ये पांढऱ्या आणि पिवळ्या दोन्ही मोत्यांचा वापर केला जातो. तसंच याचा आकार थोडा मोठा असून, याची तार सरळ रेषेत असते. आपला चेहरा थोडा चौकोनी अथवा लांबसर असेल तर, ही नथ चेहऱ्यावर शोभून दिसेल.
8 / 9
लाल आणि हिरव्या रंगाच्या खड्याची ही नथ सध्या ट्रेंडमध्ये आहे. ही नथ पुणेरी नथ म्हणूनही ओळखली जाते. या नथीमध्ये पांढऱ्या आणि पिवळ्या दोन्ही मोत्यांचा वापर केला जातो. तसंच याचा आकार थोडा मोठा असून, याची तार सरळ रेषेत असते. आपला चेहरा थोडा चौकोनी अथवा लांबसर असेल तर, ही नथ चेहऱ्यावर शोभून दिसेल.
9 / 9
काही महिलांना खूप मोठ्या आकाराच्या आणि जड नथ आवडत नाहीत. त्यांच्यासाठी हुप नथ हा प्रकार खूपच चांगला आहे. ही नथ अजिबातच जड नसते. त्याशिवाय तुम्ही बराच वेळ ही नथ घालून राहू शकता. गुजराती कम्युनिटीमध्ये या नथीचा जास्त प्रमाणात उपयोग केला जातो. पण हल्ली लेंहग्यावर अशा तऱ्हेची नथ घालण्याचा ट्रेंड आहे.
टॅग्स : गुढीपाडवा २०१८ब्यूटी टिप्समहाराष्ट्रफॅशन