1 / 9सुंदर आणि रेखीव भुवया आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य अधिक खुलवतात. भुवयांचे केस (7 oils which can help thicken eyebrows) दाट आणि गडद असतील तर डोळ्यांसोबतच संपूर्ण चेहरा देखील यामुळे अधिक तरुण आणि उठावदार दिसतो. दाट, जाडसर आणि सुंदर व रेखीव भुवया असाव्यात अशी प्रत्येकीची इच्छा असते. परंतु आपल्यापैकी बऱ्याचजणींच्या भुवयांचे केस पातळ आणि विरळ असतात. 2 / 9भुवयांचे पातळ आणि विरळ असलेले केस दाट आणि जाडसर करण्यासाठी (best oils to thicken eyebrows naturally) आपण त्यावर आयब्रो पेन्सिल फिरवतो. परंतु हा आयब्रो पेन्सिलचा कृत्रिम उपाय तात्पुरता असून त्याचा (oils for eyebrow growth & thickness) फारसा फरक दिसत नाही. यासाठीच, वेगवेगळ्या नैसर्गिक तेलांच्या मदतीने नियमित मालिश केल्यास भुवयांचे केस नैसर्गिकरित्या जाड आणि काळे होऊ शकतात. योग्य तेलाने नियमितपणे हलक्या हाताने मालिश केल्यास केसांच्या मुळांना पोषण मिळते, रक्ताभिसरण वाढते आणि भुवया हळूहळू जाड व दाट होण्यास मदत होते. कोणत्या तेलाने मालिश केल्यास आयब्रो चे केस नैसर्गिकरीत्या दाट होतील ते पाहूयात. 3 / 9भुवयांच्या केसांच्या वाढीसाठी एरंडेल तेल सर्वात फायदेशीर मानले जाते. यामध्ये असलेले 'रायसिनोलेइक ॲसिड' (Ricinoleic Acid) आणि व्हिटॅमिन-ई केसांच्या मुळांना मजबूत करतात आणि नवीन केस उगवण्यास मदत करतात. रात्री झोपण्यापूर्वी कापसाच्या साहाय्याने (Cotton Swab) थोडे तेल भुवयांवर लावा. रात्रभर तसेच राहू द्या आणि सकाळी कोमट पाण्याने धुवून टाका.4 / 9 खोबरेल तेलामध्ये असलेले 'लॉरिक ॲसिड' आणि प्रथिने केसांच्या मुळांना ताकद देतात. हे तेल भुवयांचे केस तुटण्यापासून वाचवते आणि पातळ भुवया दाट करण्यास मदत करते. याच्या नियमित वापरामुळे भुवयांना नैसर्गिक चकाकी मिळते आणि त्या भागातील त्वचाही मऊ राहते.5 / 9 बदाम तेलामध्ये बायोटिन आणि व्हिटॅमिन-ए, डी, ई मुबलक प्रमाणात असतात, जे नैसर्गिकरित्या भुवयांची वाढ (Growth) करण्यास मदत करतात. हे तेल फक्त भुवयांच्या केसांवरच नाही, तर तिथली त्वचाही मऊ - मुलायम ठेवण्यास मदत करते; हे तेल त्वचेला आतून ओलावा देते, ज्यामुळे केसांची मुळे निरोगी राहतात.6 / 9ऑलिव्ह ऑईलमध्ये ओलिक ॲसिड आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे घटक भुवयांच्या केसांच्या मुळांपर्यंत खोलवर जाऊन पोषण पोहोचवतात आणि केसांना मुळांपासून मजबूत बनवतात. यामुळे केस गळण्याचे प्रमाण कमी होऊन भुवया दाट दिसू लागतात.7 / 9 रोझमेरी ऑईल हे केसांच्या वाढीला चालना देण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. हे तेल रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे नवीन केस वेगाने उगवतात. रोझमेरी ऑईल खूप तीव्र आणि उग्र असते, त्यामुळे इतर कोणत्याही तेलाचे काही थेंब या तेलात मिसळू शकता. रोझमेरी ऑईलमधे खोबरेल किंवा ऑलिव्ह ऑईल देखील मिसळून भुवयांवर लावू शकता. यामुळे आयब्रोची वाढ जलद गतीने होते.8 / 9 जोजोबा ऑईल केसांच्या हेअर फॉलिकल्सला बंद होण्यापासून वाचवते, ज्यामुळे केसांच्या वाढीमध्ये अडथळा येत नाही. हे तेल स्काल्पच्या नैसर्गिक तेल उत्पादनामध्ये संतुलन राखण्याचे काम करते. हे तेल वजनाने खूप हलके असते, त्यामुळे ते त्वचा आणि केसांमध्ये सहजपणे शोषले जाते.9 / 9 आर्गन ऑईलमध्ये व्हिटॅमिन-ई आणि फॅटी ॲसिडस् भरपूर प्रमाणात असतात, जे केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत पोषक असतात. जर केमिकल असलेल्या ब्युटी प्रॉडक्ट्समुळे भुवयांचे केस खराब झाले असतील, तर आर्गन ऑईल ते रिपेअर करण्याचे काम करते. या तेलाच्या नियमित वापरामुळे भुवयांचे केस केवळ दाटच होत नाहीत, तर ते नैसर्गिकरित्या चमकदार आणि निरोगी दिसू लागतात.