Join us

केसांचं गळणं पाहून टेन्शन येतंय? बघा काय खायचं आणि केसांना काय लावायचं, केस गळणं बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2025 16:04 IST

1 / 8
केस गळण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच जात असेल तर पुढे सांगितलेले काही उपाय अगदी तातडीने करून पाहा.
2 / 8
याविषयी एक्सपर्ट सांगत आहेत की शरीरातलं लोह कमी झालं की केस गळणं वाढतं. त्यामुळे आहारातलं लोहाचं प्रमाण वाढवा. गाजर, बीटरुट, पालक हे पदार्थ रोजच तुमच्या आहारात असू द्या.
3 / 8
सेलेरी आणि कोथिंबीरीची हिरवी चटणीही रोज खा. या दोन्ही पदार्थांमध्ये असणारे घट केसांच्या वाढीसाठी उत्तम आहेत.
4 / 8
शाम्पू करताना, हेड मसाज करताना केसांच्या मुळाशी खूप जोरजोरात चोळणे टाळा. आधीच केस खूप नाजूक झालेले असतात. त्यामुळे ते लवकर तुटतात.
5 / 8
त्याचप्रमाणे हेअर स्ट्रेटनिंग, हेअर कर्ल्स, ब्लो ड्राय हे सगळे उपाय वारंवार करू नका. यामुळे केसांचं खूप नुकसान होतं.
6 / 8
चमचाभर मेथी दाणे रात्री झोपण्यापुर्वी पाण्यात भिजवा. भिजवलेले मेथी दाणे एका भांड्यात घ्या. त्यात १ चमचा जवस आणि १ चमचा तांदूळ घालून हे मिश्रण गॅसवर गरम करायला ठेवा. जेव्हा पाणी आटून ते जेलीसारखं होईल तेव्हा गॅस बंद करा. हे पाणी तुमच्या केसांना लावा आणि अर्ध्या तासाने केसा धुवा. केसांची मुळं पक्की होण्यास मदत होईल.
7 / 8
रोजमेरीची पानं पाण्यामध्ये घालून उकळवा. पाणी उकळून अर्धं झालं की गॅस बंद करा. हे पाणी गाळून घ्या. त्यात १ टीस्पून ॲपलसाईड व्हिनेगर घाला. हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा आणि दिवसातून २ ते ३ वेळा केसांच्या मुळाशी मारा. केस गळणं कमी होईल.
8 / 8
भृंगराज ऑईल, ब्राह्मी ऑईल आणि आवळ्याचं तेल समप्रमाणात घेऊन एकत्र करा. या तेलाने आठवड्यातून दोन वेळा डोक्याला मालिश करा. केसांची चांगली वाढ होईल. ही माहिती तज्ज्ञांनी dimplejangdaofficial या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
टॅग्स : ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी