Join us   

हिवाळ्यात मॉईश्चरायझर, बॉडीलोशन, लिपबामवर खर्च करण्यापेक्षा ६ नैसर्गिक उपाय करा- त्वचा राहील मुलायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2023 11:41 AM

1 / 9
हिवाळा आला की थंडीचा सगळ्यात पहिला परिणाम त्वचेवर दिसून येतो. त्वचा लगेच कोरडी पडायला सुरुवात होते. ओठ फुटायला लागतात.
2 / 9
तसेच तळपायाच्या भेगा वाढू लागतात. एवढंच नाही तर केसांमध्येही खूपच कोंडा होतो. म्हणूनच मग हिवाळा आला की आपल्याला बरेचसे पैसे मॉईश्चरायझर, बॉडीलोशन, लिपबाम, रात्रीचे क्रिम, पायांच्या भेंगाचे क्रिम यासाठी खर्च करावे लागतात.
3 / 9
हे सगळे खर्च टाळायचे असतील तर स्वस्तात होणारे हे काही नैसर्गिक उपाय करा. यामुळे केसांमधल्या कोंड्यापासून ते तळपायाच्या भेगांपर्यंत त्वचेच्या सगळ्याच समस्या दूर होतील आणि हिवाळ्यातही त्वचा छान मऊ- मुलायम राहील.
4 / 9
हिवाळ्यात ओठ खूप उलतात. यासाठी रात्री झोपण्यापुर्वी ओठांना आणि चेहऱ्याला सायीने किंवा साजुक तुपाने मालिश करा.
5 / 9
रोज रात्री झोपण्यापुर्वी बेंबीमध्ये थोडे बदाम तेल लावा. यामुळे त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत होते आणि मऊ होते. हा उपाय करण्यासाठी कापसाचा बोळा बदाम तेलामध्ये बुडवा आणि हलकासा पिळून मग बेंबीवर ठेवून द्या.
6 / 9
टाचांना भेगा पडू नये म्हणून १ टेबलस्पून ग्लिसरीन आणि ५ ते ६ थेंब लिंबाचा रस एकत्र करा. या मिश्रणाने टाचांना मसाज करा आणि त्यानंतर सॉक्स घाला.
7 / 9
आंघोळीच्या पाण्यात रोज मोहरीच्या तेलाचे काही थेंब टाका. यामुळे त्वचा मऊ होते.
8 / 9
आठवड्यातून एकदा खोबरेल तेलाने संपूर्ण अंगाला मसाज करा आणि त्यानंतर अर्ध्या तासाने गरम पाण्याने आंघोळ करा. यादरम्यान कुठेही धुळीत जाऊ नका.
9 / 9
लिंबाचा रस आणि दही किंवा ताक यांचे मिश्रण आठवड्यातून एकदा केसांच्या मुळाशी लावा. त्यानंतर अर्ध्या तासाने नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका. डोक्यात कोंडा होणार नाही.
टॅग्स : ब्यूटी टिप्सथंडीत त्वचेची काळजीत्वचेची काळजीकेसांची काळजीहोम रेमेडी