रोजच्या 'या' ६ चुकांमुळे त्वचा होते खराब, ऐन तारुण्यात चेहऱ्यावर सुरकुत्या-ओघळतात गाल
Updated:May 13, 2025 20:09 IST2025-05-13T20:06:39+5:302025-05-13T20:09:00+5:30
Skin care mistakes to avoid: Causes of early wrinkles and spots: Beauty tips for glowing skin: आपल्या ६ खराब सवयींमुळे त्वचेचे सौंदर्य बिघडते, कोणत्या सवयी आहेत पाहूया.

आपल्यापैकी अनेकांच्या त्वचेवर डाग, मुरुमे, डार्क सर्कल्स असतात. त्वचा सुंदर आणि तजेलदार करण्यासाठी आपण अनेक नव्या ट्रिक्स देखील अवलंबतो. (Skin care mistakes to avoid)
त्वचा सुंदर दिसावा यासाठी काही घरगुती उपायही करतो. त्वचेसाठी अनेक महागड्या उत्पादनांचा देखील वापर करतो. परंतु काही केले तरी त्वचेचा चांगली होत नाही. आपल्या ६ खराब सवयींमुळे त्वचेचे सौंदर्य बिघडते. कोणत्या सवयी आहेत पाहूया. (Causes of early wrinkles and spots)
दिवसभर धूळ, प्रदूषण आणि मेकअपमुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण जमा होते. ज्यामुळे ब्लॅकहेड्स, मुरुमे आणि त्वचेला नुकसान होते. त्यामुळे त्वचा दिवसातून दोन ते तीन वेळा धुवावा.
त्वचेला मॉइश्चरायझर न लावल्याने त्वचेची आर्द्रता जास्त वेळ टिकून राहात नाही. त्यामुळे त्वचेला नुकसान होते. चेहरा धुतल्यानंतर मॉइश्चरायझर त्वचेवर लावणे महत्त्वाचे असते.
आपल्यापैकी अनेकांना सनस्क्रीन लावण्याची सवय नसते. पंरतु, सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे चेहऱ्यावर सनस्क्रीन लावायला हवी. न लावल्यास आपल्याला सनबर्न, काळे डाग, अकाली वृद्धत्व यांसारख्या समस्या उद्भवतात.
त्वचेवर जमा झालेल्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी एक्सफोलिएशन खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी आठवड्यातून एकदा त्वचा एक्सफोलिएट करा.
गरम पाण्याने चेहऱ्याने धुतल्यास त्वचेला नुकसान पोहोचू शकते. गरम पाणी त्वचेतील ओलावा काढून टाकते. ज्यामुळे कोरडेपणा, खाज सुटणे आणि जळजळ होऊ शकते.
आपण अनेकदा चेहऱ्यावर पॅच टेस्ट न करता उत्पादने वापरतो. ज्यामुळे चेहऱ्याला अधिक नुकसान होते. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते आणि कोणतेही उत्पादने निवडण्यापूर्वी त्यातील घटक तपासा.