Join us

हिवाळ्यात फुटलेल्या टाचांसाठी ६ घरगुती उपाय! भेगाळलेल्या टाचाही होतील मुलायम, सुंदर - वेदना, दुखणे होईल कमी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2025 18:00 IST

1 / 8
हिवाळ्याचा ऋतू सुरु होताच त्वचा रूक्ष, कोरडी आणि निस्तेज होऊ लागते आणि याचा (cracked heels home remedies) सर्वाधिक परिणाम आपल्या टाचांवर लगेच दिसतो. थंड हवा आणि ओलाव्याची कमतरता यामुळे टाचांना भेगा पडू लागतात, ज्यामुळे अनेकदा वेदना आणि रक्तस्त्राव होण्याची समस्या ऐन थंडीच्या दिवसांत त्रासदायक ठरते.
2 / 8
बाजारात मिळणाऱ्या क्रीम्स आणि लोशन्स थोड्या वेळासाठी आराम देतात, पण वारंवार (6 home remedies for cracked heels in winter) पायांना पडणाऱ्या भेगांच्या समस्येवर कायमचा उपाय करणे कधीही फायदेशीर ठरते. जर आपल्याला देखील हिवाळ्यात टाचांना भेगा पडण्याचा त्रास सतावत असेल तर घरी उपलब्ध असलेल्या नैसर्गिक पदार्थांच्या मदतीने या समस्येवर आराम मिळवता येतो. टाचांवर भेगा पडण्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी खास घरगुती उपाय पाहूयात.
3 / 8
हा उपाय टाचांवरील मृत त्वचा काढून टाकून त्यांना मऊ करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. २ टेबलस्पून नारळाचे तेल आणि २ ते ३ टेबलस्पून बारीक मीठ किंवा सैंधव मीठ एकत्रित करून पेस्ट तयार करा. सगळ्यात आधी गरम पाण्याने टाचा धुवा. त्यानंतर, हा स्क्रब टाचांवर हलक्या हाताने लावून हलकेसे चोळा, विशेषतः भेगा पडलेल्या भागांवर त्यानंतर १० ते १५ मिनिटे तसेच ठेवून मग पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
4 / 8
मध एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आणि अँटीबॅक्टेरियल पदार्थ आहे, तर दूध त्वचेला मऊ बनवते. मध आणि दूध एकत्र करून एक गुळगुळीत पेस्ट तयार करा. हे मिश्रण टाचांवर लावा आणि २० ते २५ मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर, कोमट पाण्याने पाय धुवा. हा उपाय केल्याने टाचांवरील भेगांचे प्रमाण कमी होऊन त्वचा मऊ - मुलायम होते.
5 / 8
केळ त्वचेला नैसर्गिकरित्या ओलावा आणि पोषण देते. केळे मॅश करून बारीक कुस्करून घ्या आणि त्यात थोडे नारळाचे तेल किंवा मध मिसळा. ही पेस्ट भेगा पडलेल्या टाचांवर लावा आणि २० ते ३० मिनिटांपर्यंत सुकू द्या. सुकल्यानंतर पाय धुवा आणि मोजे घाला. केळ्यामध्ये असलेले जीवनसत्त्वे आणि खनिजे त्वचेला भेगा पडण्यापासून वाचवतात.
6 / 8
व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल त्वचेला रिपेअर करण्याचे आणि तिला खोलवर पोषण देण्याचे काम करते. व्हिटॅमिन ई कॅप्सूल कापून त्यातील तेल एका बाऊलमध्ये काढा, या तेलात लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी टाचांवर लावा आणि मोजे घालून झोपा. सकाळी उठून पाय धुवा. व्हिटॅमिन 'ई' त्वचेची सूज आणि भेगा भरते, तर लिंबू मृत त्वचा काढून टाकते.
7 / 8
ग्लिसरीन त्वचेमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यास खूपच फायदेशीर ठरते. ग्लिसरीन आणि गुलाबपाणी एकत्र करून एका बाटलीत भरून घ्या. दररोज रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण टाचांवर लावा. त्यानंतर मोजे घालून झोपा.
8 / 8
हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे भेगा भरण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत करतात. हळद आणि दुधावरची साय एकत्रित करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट टाचांवर लावा आणि सुकू द्या. २० ते २५ मिनिटांनंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
टॅग्स : ब्यूटी टिप्सहोम रेमेडीघरगुती उपाय