Join us

कोंड्यामुळे डोक्यातून कुबट, घाण वास येतो? ६ घरगुती हेअरमास्क- कोंडा जाऊन केस होतील सिल्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2025 12:48 IST

1 / 8
केसांमधला कोंडा खूप वाढला असेल किंवा केस खूप कोरडे पडले असतील तर कोणत्याही महागड्या ब्यूटी ट्रिटमेंट्स घेण्यापेक्षा हे काही सोपे घरगुती हेअरमास्क ट्राय करून पाहा..(6 home made hair mask for healthy hair)
2 / 8
केसांमध्ये खूप छान बदल घडवून आणणारे हे साधे- सोपे आणि स्वस्तात मस्त हेअरमास्क कसे तयार करायचे (6 homemade hair mask for dry frizzy hair), याविषयीची माहिती pranabydimple या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.(how to get rid of dandruff?)
3 / 8
यामध्ये सांगितलेला सगळ्यात पहिला उपाय म्हणजे एका पातेल्यामध्ये मेथी दाणे, तांदूळ आणि जवस हे सम प्रमाणात घ्या. एका पातेल्यामध्ये ग्लासभर पाणी घेऊन त्यात हे तिन्ही पदार्थ गरम करायला ठेवा. जेव्हा पाण्याला चांगली उकळी येईल आणि पाणी थोडेसे घट्ट होईल तेव्हा गॅस बंद करा. थंड झाल्यानंतर हा मास्क तुमच्या केसांच्या मुळाशी आणि केसांच्या लांबीवरही लावा. यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होऊन ते मऊ होतील.
4 / 8
कोरफडीचा गर केसांच्या मुळाशी आणि केसांच्या लांबीवर लावल्यामुळे केस मऊ आणि चमकदार होतात.
5 / 8
दही आणि स्ट्रॉबेरीचा गर हे दोन्ही पदार्थ सम प्रमाणात एकत्र करून केसांना लावा. यामुळेही केसांचे टेक्स्चर छान होण्यास मदत होईल. शिवाय केस छान फुगीर दिसतील.
6 / 8
डोक्यात जर खूप कोंडा झाला असेल तर दूध किंवा दह्यामध्ये लिंबाचा रस घाला आणि हे मिश्रण तुमच्या केसांच्या मुळाशी लावा. त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवा. यामुळे केसातला कोंडा आणि त्यामुळे डोक्यातून येणारी दुर्गंधी कमी होण्यास मदत होईल.
7 / 8
ॲपल साईड व्हिनेगर आणि पाणी हे दोन्ही समप्रमाणात घ्या आणि त्याने केसांच्या मुळाशी मालिश करा. यामुळे डोक्यातला कोंडा कमी होईल.
8 / 8
दूध किंवा दह्यामध्ये केळी कुस्करून घ्या. हा लेप केसांच्या मुळाशी आणि केसांच्या लांबीवर लावा. यामुळे तुमच्या केसांचा थिकनेस चांगला होईल. पातळ केस असले तरी ते छान फुललेले दिसतील.
टॅग्स : ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी