एरंडेल तेलाचे फक्त काही थेंब त्वचेला देतील ६ जबरदस्त फायदे, 'या' पद्धतीने लावा- सौंदर्य खुलेल
Updated:December 12, 2025 15:10 IST2025-12-12T15:04:15+5:302025-12-12T15:10:50+5:30

त्वचेच्या वेगवेगळ्या तक्रारी दूर करायच्या असतील तर एरंडेल तेल काही दिवस नियमितपणे वापरून पाहा.(6 amazing benefits of applying castor oil on face)
रोज रात्री झोपण्यापुर्वी कापसाच्या बोळ्यावर एरंडेल तेलाचे काही थेंब घ्या आणि त्याने चेहऱ्याला मालिश करा (how to apply castor oil on face?). १५ दिवस सलग हा उपाय करून पाहा (skin care tips using castor oil). त्वचेमध्ये खूप छान बदल दिसून येईल. (castor oil benefits)
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडू नये म्हणून कॅस्टर ऑईलने चेहऱ्याला मसाज करणे खूप फायदेशीर ठरते.
चेहऱ्यावरच्या बारीक सुरकुत्या कमी करण्यासाठीही एरंडेल तेल मदत करते. यामुळे त्वचेचे तारुण्य टिकून राहण्यास मदत होते.
काही जणांना चेहऱ्यावर सतत पिंपल्स येण्याचा त्रास होतो आणि त्या पिंपल्सचे डागही त्वचेवर राहतात. पिंपल्स आणि पिंपल्सचे डाग दोन्हीही कमी करायचे असतील तर कॅस्टर ऑईलने चेहऱ्याला मालिश करा.
पिगमेंटेशन किंवा चेहऱ्यावरचे वांगाचे डाग कमी करण्यासाठीही कॅस्टर ऑईल उपयुक्त ठरते.
काहीजणांच्या भुवया खूपच पातळ असतात. त्या छान जाड, दाट होण्यासाठी भुवयांना कॅस्टर ऑईलने मसाज करा. भुवयांच्या केसांची चांगली वाढ होईल.
ओठांचा काळेपणा खूप वाढला असेल तर कॅस्टर ऑईल घेऊन ओठांना मसाज करा. काही दिवसांतच ओठांचा रंग बदलल्यासारखा जाणवेल.