गालांवर खूप ओपन पोअर्स असल्याने चेहरा थोराड दिसतो? ५ टिप्स- त्वचा होईल नितळ- स्वच्छ

Updated:February 13, 2025 11:52 IST2025-02-13T11:45:14+5:302025-02-13T11:52:07+5:30

गालांवर खूप ओपन पोअर्स असल्याने चेहरा थोराड दिसतो? ५ टिप्स- त्वचा होईल नितळ- स्वच्छ

काही जणींच्या गालांवर, कपाळावर, हनुवटीच्या भागात खूप जास्त प्रमाणात ओपन पोअर्स दिसतात (5 tips to reduce open pores). यामुळे मग वय कमी असूनही त्या जास्त वयस्कर दिसतात.(how to get rid of open pores?)

गालांवर खूप ओपन पोअर्स असल्याने चेहरा थोराड दिसतो? ५ टिप्स- त्वचा होईल नितळ- स्वच्छ

असं तुमच्या बाबतीत होत असेल तर हे काही घरगुती उपाय करून पाहा (skin care tips to hide open pores). यामुळे ओपन पोअर्स बऱ्याच प्रमाणात झाकले जाऊन चेहऱ्याची त्वचा एकसारखी नितळ, स्वच्छ दिसेल.(home hacks to reduce visible pores)

गालांवर खूप ओपन पोअर्स असल्याने चेहरा थोराड दिसतो? ५ टिप्स- त्वचा होईल नितळ- स्वच्छ

दिवसातून दोन ते तीन वेळा चेहरा धुवायला हवा. यामुळे चेहरा स्वच्छ राहण्यास मदत होते. चेहरा धुण्यासाठी कोणतंही सॉफ्ट, जेन्टल क्लिंझर वापरावं.

गालांवर खूप ओपन पोअर्स असल्याने चेहरा थोराड दिसतो? ५ टिप्स- त्वचा होईल नितळ- स्वच्छ

त्वचेवरचं डेडस्किनचं प्रमाण वाढलं की चेहऱ्यावरचे ओपन पोअर्स जास्त स्पष्टपणे दिसू लागतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा नियमितपणे चेहऱ्याला स्क्रबिंग करा. यासाठी तुम्ही घरगुती पदार्थांचाही वापर करू शकता.

गालांवर खूप ओपन पोअर्स असल्याने चेहरा थोराड दिसतो? ५ टिप्स- त्वचा होईल नितळ- स्वच्छ

आठवड्यातून एकदा त्वचेला क्ले मास्क लावा. क्ले मास्कचा नियमित वापर केल्यामुळे त्वचेचा सैलसरपणा कमी होऊन त्वचा टाईट होते आणि ओपन पोअर्सचं प्रमाण कमी होतं.

गालांवर खूप ओपन पोअर्स असल्याने चेहरा थोराड दिसतो? ५ टिप्स- त्वचा होईल नितळ- स्वच्छ

ज्यांचे ओपन पोअर्स खूप जास्त दिसतात त्यांनी नेहमी ऑईल फ्री लाईटवेट या प्रकारातलं मॉईश्चरायझर वापरावं.

गालांवर खूप ओपन पोअर्स असल्याने चेहरा थोराड दिसतो? ५ टिप्स- त्वचा होईल नितळ- स्वच्छ

सुती कपड्यामध्ये बर्फ गुंडाळा आणि तो तुमच्या चेहऱ्यावर एखाद्या मिनिटासाठी हळुवारपणे फिरवा. यामुळेही त्वचा टाईट होते आणि ओपन पोअर्स बऱ्याच प्रमाणात कमी होतात. हा उपायही आठवड्यातून एकदा करावा.