लग्नापर्यंत चेहऱ्यावर मस्त ग्लो हवा? ५ साध्या- सोप्या टिप्स, फेशियल न करताही चेहरा चमकेल..
Updated:November 8, 2025 14:07 IST2025-11-08T14:01:16+5:302025-11-08T14:07:26+5:30

सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे ज्यांचे आता लग्न आहे, त्या नववधू तर या दिवसांत त्यांच्या त्वचेबाबत, सौंदर्याबाबत विशेष सतर्क झालेल्या दिसतात.
म्हणूनच लग्नाच्या दिवशी आपण नैसर्गिकपणे सुंदर, तेजस्वी दिसावं असं वाटत असेल तर आतापासूनच पुढे सांगितलेल्या ५ गोष्टी नेमाने करायला सुरुवात करा. त्याचा खूप चांगला परिणाम तुमच्या त्वचेवर जाणवायला लागेल.
पाणी प्यायला विसरू नका. त्वचेवर छान ग्लो हवा असेल तर बॉडी हायड्रेटेड असणं खूप गरजेचं आहे. पाणी पुरेशा प्रमाणात प्यायल्याने शरीर हायड्रेटेड तर राहातेच पण त्यासोबतच शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर पडायलाही मदत होते. त्याचाही खूप छान परिणाम त्वचेवर दिसून येतो.
त्वचेवर ग्लो आणणारी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इलेक्ट्रोलाईट्स. नारळपाण्यामध्ये भरपूर प्रमाणात इलेक्ट्रोलाईट्स असतात. त्यामुळे काही दिवस नारळपाणीही नियमितपणे प्या..
तुमच्या आहारात पुरेशा प्रमाणात फायबर असणं गरजेचं आहे. कारण फायबरमुळे पोट साफ होण्यास मदत होते. पोट साफ झाले की आपोआपच त्वचाही तुकतुकीत, नितळ राहण्यास मदत होते. त्यामुळे आहारात फायबर हवेच.. यासाठी तुम्ही रोज सकाळी २ चमचे चिया सीड्स पाण्यात घालून घेऊ शकता.
या दिवसांत मिठाई खाण्याचं प्रमाण कमी करा. कारण मिठाईमध्ये जास्त कॅलरीज असतात. शिवाय अतिरिक्त साखर असते, जी त्वचेसाठी अजिबातच चांगली नाही.
राेज काही ना काही व्यायाम नक्की करा. व्यायाम जमत नसेल तर दिवसभरातून १० हजार पावलं चालून होतील एवढं तरी वॉकिंग करा. या सगळ्या गोष्टींचा खूप चांगला परिणाम तुमच्या शरीरावर दिसून येतो.