धूळ, ऊन यामुळे त्वचा खूपच रखरखीत- डल झाली? ५ सोप्या टिप्स- त्वचेचं सौंदर्य खुलून येईल

Updated:May 15, 2025 16:57 IST2025-05-15T16:51:46+5:302025-05-15T16:57:33+5:30

धूळ, ऊन यामुळे त्वचा खूपच रखरखीत- डल झाली? ५ सोप्या टिप्स- त्वचेचं सौंदर्य खुलून येईल

उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचेची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. कारण आधीच वाढत्या उन्हामुळे नाजुक त्वचेचं खूप नुकसान होतं आणि त्यात पुन्हा त्वचेला धूर, धुळ, प्रदुषण यामुळेही त्रास होतो.(5 skin care tips for dry and dull skin in summer)

धूळ, ऊन यामुळे त्वचा खूपच रखरखीत- डल झाली? ५ सोप्या टिप्स- त्वचेचं सौंदर्य खुलून येईल

चेहरा पुर्णपणे झाकून घराबाहेर पडलं तरीही त्वचेला त्रास होतोच.. त्वचा रापल्यासारखी दिसते. टॅनिंग आणि डेडस्किन यांचं प्रमाणही वाढतं. म्हणूनच हा त्रास कमी करायचा असेल तर तुमचं स्किन केअर रुटीन थोडंसं बदला (how to take care of skin in summer?). यामुळे त्वचेची हरवलेली चमक वापस येण्यास नक्कीच मदत होईल.(skin care routine in summer)

धूळ, ऊन यामुळे त्वचा खूपच रखरखीत- डल झाली? ५ सोप्या टिप्स- त्वचेचं सौंदर्य खुलून येईल

डेड स्किन किंवा टॅनिंग कमी करण्यासाठी स्क्रबिंग करणं गरजेचं आहे. पण खूप जास्त स्क्रबिंग करणं त्वचेसाठी घातक ठरू शकतं. आठवड्यातून एकदा माईल्ड स्क्रब वापरून त्वचा स्वच्छ करा. स्क्रबिंग करताना त्वचेवर जोरात घासणं टाळा.

धूळ, ऊन यामुळे त्वचा खूपच रखरखीत- डल झाली? ५ सोप्या टिप्स- त्वचेचं सौंदर्य खुलून येईल

उन्हाळ्याच्या दिवसांत सनस्क्रिन वापरताना हयगय करू नका. ते तुमच्या त्वचेसाठी अतिशय गरजेचं आहे. सनस्क्रिनची निवड करताना ते कमीतकमी 50 एसपीएफचं असणं गरजेचं आहे.

धूळ, ऊन यामुळे त्वचा खूपच रखरखीत- डल झाली? ५ सोप्या टिप्स- त्वचेचं सौंदर्य खुलून येईल

त्वचेचं तेज कायम ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सी देखील खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुमच्या आहारात व्हिटॅमिन सी असणारी फळं तर घ्यायलाच हवीत. पण व्हिटॅमिन सी असणारं सिरम, फेसवॉश, क्रिम लावूनही त्वचेची काळजी घ्यावी.

धूळ, ऊन यामुळे त्वचा खूपच रखरखीत- डल झाली? ५ सोप्या टिप्स- त्वचेचं सौंदर्य खुलून येईल

दिवसातून दोन वेळा आणि विशेषत: रात्री झोपण्यापुर्वी चेहरा स्वच्छ धुवायलाच हवा. कारण यामुळे दिवसभर त्वचेला चिकटलेली धूळ, घाण निघून जाते. त्वचा स्वच्छ होते.

धूळ, ऊन यामुळे त्वचा खूपच रखरखीत- डल झाली? ५ सोप्या टिप्स- त्वचेचं सौंदर्य खुलून येईल

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. यामुळे मेकअप करणे ओघाने आलेच. मेकअप करताना ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जे कॉस्मेटिक्स वापरत आहात ते चांगल्या दर्जाचेच हवे. त्यांची एक्सपायरी डेट तपासून घ्यावी. कारण त्यामुळेही त्वचेचे नुकसान होऊ शकते.