1 / 6तुमचेही केस खूप गळत असतील किंवा तुटत असतील तर पुढे सांगितलेले काही साधे, सोपे उपाय करून पाहा. केस गळण्याचं प्रमाण निश्चितच कमी होईल.(5 simple tips to reduce hair fall)2 / 6पहिली गोष्ट म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केसांना तेल लावून व्यवस्थित मालिश करायलाच हवी. तेलामुळे केसांमधलं मॉईश्चर टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे केस कोरडे होत नाहीत. पण तेल लावताना खूप जोरजोरात डोक्याला चोळू नका. यामुळे केस मुळापासून तुटतात. जास्त गळतात.3 / 6दुसरी गोष्ट म्हणजे ओले असणारे केस कधीही घट्ट बांधू नका. त्यांची मुळं खूप नाजूक झालेली असतात. असे केस लवकर तुटतात. 4 / 6तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री झोपण्यापुर्वी केसांच्या मुळाशी हलक्या हाताने मसाज करा. यामुळे डोक्याच्या त्वचेखालचा रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि केसांची मुळं पक्की होण्यास मदत होते.5 / 6रोज २ ते ३ बदाम आणि चमचाभर तूप नियमितपणे खा. यामुळेही केस मजबूत होण्यास मदत होते.6 / 6दर आठवड्याला उशीची खोळ बदला. कारण त्यामुळे डोक्यात बॅक्टेरियल, फंगल इन्फेक्शन वाढतं. डोक्यात कोंडा होतो आणि मग केस गळण्याचं प्रमाण वाढतं. आयुर्वेदतज्ज्ञांनी या टिप्स dr_kavitas_herballey या इंस्टाग्राम पेजवर शेअर केल्या आहेत.