'या' इवल्याशा बिया तुमच्या केसांना बनवतील दाट, लांब आणि काळेभोर! छोट्या बियांची मोठी जादू

Updated:October 10, 2025 17:37 IST2025-10-10T17:30:10+5:302025-10-10T17:37:35+5:30

'या' इवल्याशा बिया तुमच्या केसांना बनवतील दाट, लांब आणि काळेभोर! छोट्या बियांची मोठी जादू

केस जर लांबसडक, दाट व्हावे असं वाटत असेल तर या काही बिया तुम्ही रोजच्या रोज खायला हव्या. या बियांमुळे केसांना भरपूर पौष्टिक पदार्थ मिळतात आणि त्यामुळे केस मुळातूनच निरोगी होण्यास मदत होते.(5 seeds that helps to control hair fall)

'या' इवल्याशा बिया तुमच्या केसांना बनवतील दाट, लांब आणि काळेभोर! छोट्या बियांची मोठी जादू

सगळ्यात पहिलं आहे जवस. जवसामध्ये ओमेगा ३ भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे डोक्याच्या त्वचेला पोषण मिळतं आणि केस सिल्की, चमकदार होण्यास मदत होते.

'या' इवल्याशा बिया तुमच्या केसांना बनवतील दाट, लांब आणि काळेभोर! छोट्या बियांची मोठी जादू

केसांसाठी काळे तीळ अतिशय पौष्टिक आहेत. त्यातून लोह, कॅल्शियम चांगल्या प्रमाणात मिळतं. केसांची मूळं पक्की होऊन केस गळणं कमी होतं.

'या' इवल्याशा बिया तुमच्या केसांना बनवतील दाट, लांब आणि काळेभोर! छोट्या बियांची मोठी जादू

आपल्याकडे बाळंतिणीला अळिवाचे लाडू, अळिवाची खीर दिली जाते. ते केसांसाठीही अतिशय फायदेशीर असतं. कारण त्यातून भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, लोह मिळतं. त्यामुळे केसांची चांगली वाढ होऊन त्यांच्यावर चमक येते.

'या' इवल्याशा बिया तुमच्या केसांना बनवतील दाट, लांब आणि काळेभोर! छोट्या बियांची मोठी जादू

भोपळ्याच्या बिया नियमितपणे खाणेही केसांसाठी अतिशय चांगले आहे. कारण त्यातून मिळणारे झिंक केस गळणं कमी करण्यासाठी मदत करतात.

'या' इवल्याशा बिया तुमच्या केसांना बनवतील दाट, लांब आणि काळेभोर! छोट्या बियांची मोठी जादू

मेथी दाणेही तुम्ही नियमितपणे खा, तसेच त्यांचा हेअरमास्क तयार करून केसांना लावा. कारण त्यांच्यामध्ये असणाऱ्या पौष्टिक गुणांमुळे केस गळणं तर कमी होतंच पण केसांची वाढही खूप पटापट होते.