५ नॅचरल ॲण्टीएजिंग पदार्थ! नियमित खा, त्वचा राहील चमकदार- सुंदर, विकतच्या क्रिमची गरजच नाही
Updated:January 7, 2023 14:39 IST2023-01-07T14:33:37+5:302023-01-07T14:39:40+5:30

१. त्वचेवर कमी वयातच सुरकुत्या येऊ नयेत, म्हणून पंचविशीनंतरच त्वचेची विशेष काळजी घ्यायला सुरुवात करावी आणि चेहऱ्याला वेगवेगळे ॲण्टी एजिंग क्रिम लावावेत, असा सल्ला दिला जातो. त्यामुळे त्वचा तरुण राहण्यास मदत होते.
२. पण आपल्या आजुबाजुला काही खाद्यपदार्थ असेही असतात, ज्यांना नॅचरल ॲण्टीएजिंग पदार्थ म्हणून ओळखले जाते (food that reduces wrinkles). हे पदार्थ जर आपण नियमितपणे खाल्ले तर त्यातून त्वचेला पोषण मिळते आणि त्वचा तरुण राहण्यास मदत होते.. आणि अर्थातच त्यामुळे मग त्वचेवर विकतचे ॲण्टीएजिंग क्रिम लावण्याची गरजच राहात नाही.
३. असे नॅचरल ॲण्टीएजिंग पदार्थ म्हणजे नेमके कोणते आहेत, याविषयीची माहिती आहारतज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी lovneetb या त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. हे पदार्थ जर नियमितपणे खाल्ले तर एजिंग प्रोसेसचा वेग खूप कमी होतो, असं त्यांचं म्हणणं आहे.
४. यातला सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे पपई. त्यामध्ये असणारं papain हे एन्झाईम त्वचेसाठी अतिशय पोषक असतं. पपईमध्ये लायकोपीन सारखे ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. जे एजिंग प्रोसेसचा वेग कमी करण्यास मदत करतात.
५. दुसरं फळ म्हणजे डाळिंब. डाळिंबामध्ये असणारा punicalagins हा घटक त्वचेतील कोलॅजीन (collagen) टिकवून ठेवण्यास मदत करतो आणि त्यामुळे त्वचा अधिककाळ तरुण राहाते.
६. दह्यामध्ये असणारे लॅक्टीक ॲसिड त्वचेचा घट्टपणा टिकवून ठेवण्यास फायदेशीर ठरतात. त्यामुळे त्वचा सैलसर पडत नाही आणि अकाली सुरकुत्याही येत नाहीत. तसेच दह्यामध्ये असणारे व्हिटॅमिन बी १२ त्वचा चमकदार आणि हायड्रेटेड ठेवते.
७. हिरव्या पालेभाज्यांमध्ये असणारे क्लोरोफिल त्वचेमधील कोलॅजीनची (collagen) पातळी वाढविण्यास मदत करतात.
८. टोमॅटोमध्ये लायकोपीन भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे त्वचेचा पोत चांगला राहण्यास मदत होते. शिवाय त्यात भरपूर प्रमाणात असणारे व्हिटॅमिन सी कोलॅजीनच्या (collagen) निर्मितीचा वेग वाढविण्यास मदत करते