वेणी घालण्याचे ५ सोपे प्रकार, केस दिसतील सुंदर आणि गुंताही होणार नाही - स्टाइलही आणि काळजीही
Updated:November 20, 2025 10:06 IST2025-11-20T10:00:24+5:302025-11-20T10:06:54+5:30
5 easy ways to braid your hair, your hair will look beautiful and won't tangle - styling and care : वेणी घालण्याचे ५ सुंदर प्रकार. पाहा केस कसे सुंदर ठेवायचे.

वेणी घालणे ओल्ड फॅशन वाटते? मुळात तसे नसून वेणी हा फार सुंदर दिसणारा आणि आरामदायी प्रकार आहे. त्यामुळे केसांची वेणी बांधणे फायद्याचे ठरते.
केसांत गुंता कमी होतो, केस कमी गळतात आणि पटकन तुटतही नाहीत. वेणी घातल्यावर हे सगळे फायदे मिळतात. वेणी विविध प्रकारे घालता येते. पाहा ५ हेअरस्टाइल.
सगळ्यात मूलभूत आणि पारंपरिक वेणी. केस तीन भागांत विभागून बांधली जाते. शाळेत जाताना अशी वेणी घातली जाते. त्यामुळे केस चांगले राहतात. गुंतत नाहीत.
सागर वेणी भारतात फार लोकप्रिय आहे. ही एकदा बांधली की लगेच विस्कटत नाही. बराच वेळ तशीच राहते. केस गुंततही नाहीत. दिसतेही सुंदर.
दोन वेण्या आधी फक्त लहान मुली घालत असत. मात्र आता दोन वेण्या घालणे एक फॅशन आहे. अनेक जणी ऑफीसला तसेच कॉलेजमध्ये जायलाही अशी वेणी घालतात.
डच वेणी बांधायला जरा वेळ जास्त लागतो, मात्र दिसते सुंदर तसेच जगभरातील मुली ही फॅशन फॉलो करतात. नक्की करुन पाहा.
वॉटर फॉल ब्रिड्स हा एक फार मस्त दिसणारा प्रकार आहे. त्यात अर्धीच वेणी घातली जाते. बकी केस मोकळे असतात. फार वेगळी आणि भारी हेअरस्टाइल आहे.