तारुण्य कधी सरणारच नाही! ५ पदार्थ रोज खा-त्वचेवर वयाची एकही खूण दिसणार नाही

Updated:April 3, 2025 19:36 IST2025-04-01T17:22:44+5:302025-04-03T19:36:51+5:30

तारुण्य कधी सरणारच नाही! ५ पदार्थ रोज खा-त्वचेवर वयाची एकही खूण दिसणार नाही

त्वचा तरुण आणि सुंदर राहावी असं वाटत असेल तर त्वचेचं आरोग्य जपणारे काही पदार्थ आपल्या आहारात नियमितपणे असायलाच हवेत. कारण बऱ्याचदा वरवरचे क्रिम लावून काही उपयोग नसतो (how to keep skin healthy and young for long?). त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी तिला आहारातून योग्य पोषण मिळणं गरजेचं असतं.

तारुण्य कधी सरणारच नाही! ५ पदार्थ रोज खा-त्वचेवर वयाची एकही खूण दिसणार नाही

म्हणूनच आता आपण असे काही पदार्थ पाहूया जे त्वचेसाठी अतिशय उत्तम ठरतात. ते पदार्थ तुम्ही नियमितपणे खाल्ले तर नक्कीच वय वाढलं तरी त्वचा मात्र तरुण आणि तुकतुकीतच राहील..(superfood for glowing skin)

तारुण्य कधी सरणारच नाही! ५ पदार्थ रोज खा-त्वचेवर वयाची एकही खूण दिसणार नाही

त्यापैकी पहिलं आहे संत्री- मोसंबी. या फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. शिवाय त्वचेमध्ये होणारं कोलॅजिन सिंथेसिस आणि स्किन रिपेअरिंग यासाठी ती फळं अतिशय उत्तम ठरतात.

तारुण्य कधी सरणारच नाही! ५ पदार्थ रोज खा-त्वचेवर वयाची एकही खूण दिसणार नाही

टोमॅटोमध्ये त्वचेसाठी अतिशय उपयोगी ठरणारे आणि त्वचेची काळजी घेणारे लायकोपीन हे ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे रोजच्या आहारात नियमितपणे थोडा टोमॅटो असायलाच हवा.

तारुण्य कधी सरणारच नाही! ५ पदार्थ रोज खा-त्वचेवर वयाची एकही खूण दिसणार नाही

तिसरा पदार्थ आहे बदाम. बदामामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स, व्हिटॅमिन ई, पॉलिफिनॉल्स असे त्वचेसाठी पोषक असणारे सगळेच घटक पुरेशा प्रमाणात असतात.

तारुण्य कधी सरणारच नाही! ५ पदार्थ रोज खा-त्वचेवर वयाची एकही खूण दिसणार नाही

सोयाबीनमध्ये इसोफ्लेवॉन हा घटक असतो. त्याचे स्ट्रक्चर जवळपास इस्ट्रोजीन या हार्मोनसारखे असते. जेव्हा महिला मेनोपॉजच्या उंबरठ्यावर येतात तेव्हा त्यांच्या शरीरातली इस्ट्रोजीन लेव्हल कमी होते आणि त्वचा कोरडी पडून सुरकुतायला लागते. अशावेळी जर तुम्ही पुरेशा प्रमाणात सोयाबीन खात असाल तर तुमच्या त्वचेची लवचिकता टिकून राहण्यासाठी मदत होऊ शकते. त्यामुळे आपोआपच त्वचा सुरकुतण्याचा वेग कमी होत जातो.

तारुण्य कधी सरणारच नाही! ५ पदार्थ रोज खा-त्वचेवर वयाची एकही खूण दिसणार नाही

कोका पावडर कोणत्या ना कोणत्या स्वरुपात नियमितपणे घेतल्यास त्यातून फ्लेवनॉल्स मिळतात. हे घटक त्वचेतला ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस कमी करून रक्तपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे आपोआपच त्वचा रिलॅक्स होऊन तजेलदार दिसू लागते.