त्वचेची काळजी घेण्यासाठी फक्त ४ सोप्या टिप्स, ना पिंपल्स येतील ना सुरकुत्या... करून पाहा

Updated:March 13, 2026 12:31 IST2026-03-13T12:27:27+5:302026-03-13T12:31:19+5:30

त्वचेची काळजी घेण्यासाठी फक्त ४ सोप्या टिप्स, ना पिंपल्स येतील ना सुरकुत्या... करून पाहा

त्वचेची काळजी घेणं म्हणजे त्वचेवर खूप साऱ्या वेगवेगळ्या कॉस्मेटिक्सचा मारा करणं असं मुळीच नसतं. काही साधे सोपे घरगुती उपाय जर आपण नियमितपणे केले तरी त्वचा खूप चांगली राहाते.

त्वचेची काळजी घेण्यासाठी फक्त ४ सोप्या टिप्स, ना पिंपल्स येतील ना सुरकुत्या... करून पाहा

यासाठी नेमकं काय केलं पाहिजे ते पाहूया.. सगळ्यात आधी तर तुमच्या त्वचेला गरज असते ती चांगल्या क्लिंझरची. कोणतंही माईल्ड क्लिंझर वापरायला हवं. त्याच्या सुगंधावर न जाता ते खरंच आपल्या त्वचेला संरक्षण देऊ शकतं का याचा विचार व्हायला हवा.

त्वचेची काळजी घेण्यासाठी फक्त ४ सोप्या टिप्स, ना पिंपल्स येतील ना सुरकुत्या... करून पाहा

दुसरं आहे मॉईश्चरायजर. तुमची त्वचा ऑईली आहे, मिक्स आहे की ड्राय आहे हे आधी लक्षात घ्या आणि त्यानुसार मॉईश्चरायजर निवडा. मॉईश्चरायजर असं असावं जे बाहेरच्या प्रदुषणापासून तुमच्या त्वचेचं संरक्षण करू शकेल.

त्वचेची काळजी घेण्यासाठी फक्त ४ सोप्या टिप्स, ना पिंपल्स येतील ना सुरकुत्या... करून पाहा

मॉईश्चरायजर लावल्यानंतर सनस्क्रिन लोशन लावणंही खूप गरजेचं आहे. हे सगळे कॉस्मेटिक्स फॅन्सी प्रकारातले असण्यापेक्षा मेडिकेटेड असावेत. जेणेकरून ते त्वचेची काळजी घेऊ शकतील.

त्वचेची काळजी घेण्यासाठी फक्त ४ सोप्या टिप्स, ना पिंपल्स येतील ना सुरकुत्या... करून पाहा

सगळ्यात शेवटचं म्हणजे त्वचेसाठी असणारं नाईट स्किन केअर रुटीन. रात्रीदेखील त्वचेला व्हिटॅमिन सी, रेटिनॉल असे त्वचेसाठी उपयुक्त ठरणाऱ्या घटकांचं सिरम लावावं. यामुळे त्वचा रिपेअरिंग होण्याचं काम आणखी उत्तम होतं..