Join us
Daily Top 2 Weekly Top 5

उगीच कशाला करता शोधाशोध, सुंदर केसांसाठी रोज ३ सुपरफूड खा! केसांच्या सगळ्या समस्याच संपतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2026 16:05 IST

1 / 6
हल्ली केसांच्या वेगवेगळ्या तक्रारी खूप वाढल्या आहेत. कारण केसांना आपल्या आहारातून पुरेशा प्रमाणात पोषण मिळत नाही.
2 / 6
केसांच्या कुठल्याही तक्रारी असल्या की आपण सगळ्यात आधी भर देतो तो तेल किंवा शाम्पू बदलण्यावर. पण त्यापेक्षा आहारात जर काही बदल केला तर त्याने केसांना नैसर्गिकदृष्ट्या भरपूर पोषण मिळते.
3 / 6
म्हणून छान लांबसडक, काळेभोर, दाट केस हवे असतील तर पुढे सांगितलेले पदार्थ नियमितपणे खायला सुरुवात करा.
4 / 6
त्यापैकी सगळ्यात पहिला पदार्थ आहे भोपळ्याच्या बिया. भोपळ्याच्या बिया शरीरातला वात नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात. यामुळे केस गळण्याचे प्रमाण कमी होते. शरीरातला वात कमी झाला की केसही तुटत नाहीत.
5 / 6
दुसरे म्हणजे तीळ. तिळामध्ये कॉपर चांगल्या प्रमाणात असते. शरीराला कॉपर पुरेशा प्रमाणात मिळाले तर मेलॅनिनची निर्मिती चांगल्या प्रमाणात होते आणि त्यामुळे कमी वयात केस पांढरे होत नाहीत.
6 / 6
तिसरा पदार्थ म्हणजे खोबरे. खोबऱ्यामध्ये फॅटी ऍसिड आणि केसांना नैसर्गिक चमक आणणारे प्रोटीन चांगल्या प्रमाणात असतात. खोबरे नियमितपणे खाल्ल्यास केसांची वाढही चांगली होते. यासाठी तुम्ही ओले किंवा सुके खोबरे खाऊ शकता. ज्यांना ॲसिडिटीचा त्रास असेल त्यांनी सुके खोबरे खाणे टाळावे. ही माहिती आयुर्वेदतज्ज्ञांनी dr.manisha.mishra या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
टॅग्स : ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी