वांगाचे जुनाट डागही काही दिवसांतच होतील गायब! फक्त २ पदार्थ वापरा- चेहरा होईल नितळ, स्वच्छ
Updated:September 8, 2025 16:23 IST2025-09-08T16:18:09+5:302025-09-08T16:23:23+5:30

तिशीनंतर कित्येकांच्या चेहऱ्यावर वांगाचे डाग यायला सुरुवात झालेली दिसते. सुरुवातीला ते अगदीच बारीक असतात. तिळापेक्षाही लहान असतात. त्यामुळे आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो.(2 simple tricks to get rid of pigmentation)
पण नंतर मात्र ते वाढत जातात. गालावर, नाकावर, कपाळावर, हनुवटीवर वांगाचे डाग अगदी स्पष्ट दिसायला लागतात. त्याचा परिणाम साहजिकच तुमच्या सौंदर्यावरही होतोच.(how to remove pigmentation and dark spots?)
त्यामुळेच जर चेहऱ्यावर वांगाचे डाग दिसायला असतील तर हा एक उपाय करून पाहा. हा उपाय काही ब्यूटी एक्सपर्टने सुचवलेला आहे. पण तो करण्याआधी पॅच टेस्ट मात्र नक्की घ्या.
हा उपाय करण्यासाठी मधामध्ये थोडी दालचिनी उगाळून घ्या आणि ते वांगाच्या डागावर ५ ते ७ मिनिटांसाठी लावून ठेवा. यानंतर चेहरा धुवून टाका. एक दिवसाआड हा उपाय करू शकता. पण हा लेप लावल्यावर जर खूप जळजळ होत असेल तर मात्र हा उपाय करू नका.
दालचिनीमधले ॲण्टी बॅक्टेरियल, ॲण्टीफंगल घटक तसेच ॲण्टीऑक्सिडंट्स त्वचेला नितळ, स्वच्छ करण्यासाठी मदत करतात.
मधामध्ये दालचिनीसोबतच जायफळ आणि हळकुंड उगाळा आणि या तिन्हींचा लेप वांगाच्या डागावर लावा. हा उपाय केल्यानेही वांगाचे डाग कमी होण्यास मदत होते. हा उपाय करण्यापुर्वी पॅच टेस्ट घ्या.