1 / 10१. प्रियांका चोप्रा: या माजी मिसवर्ल्डकडे नेहमीच एक फॅशन आयकॉन म्हणून पाहिले जाते. तिने २०२० सालच्या ग्रॅमी ॲवार्ड सोहळ्यात label Ralph & Russo या ब्रँडने डिझाईन केलेला ड्रेस घातला होता. डिप नेक लाईन असलेला प्रियांकाचा हा ड्रेस तब्बल ७७ लाख रूपयांचा होता.. 2 / 10२. उर्वशी रौतेला- बॉलीवूड अभिनेत्री तसेच मिस युनिव्हर्स उर्वशी रौतेला हिने एका म्युझिकल अल्बमसाठी हा ड्रेस घातला होता. हा ड्रेस तब्बल १५ कोटी रूपयांचा आहे, असं सांगितलं जातं. Donatella Versace या ब्रॅण्डतर्फे हा ड्रेस डिझाईन करण्यात आला होताे. 3 / 10३. अनुष्का शर्मा- पती विराट कोहली याच्यासोबत न्यू इयर पार्टी सेलिब्रेट करण्यासाठी अनुष्काने हा महागडा ड्रेस घातला होता. तिचा हा ड्रेस रोहित गांधी आणि राहूल खन्ना यांनी डिझाईन केला असून ड्रेसची किंमत २ लाख ४५ हजार रूपये असल्याचं सांगितलं जातं. 4 / 10 ४. करिना कपूर खान- दोन मुलांची आई होऊनही करिना कपूरची स्टाईल आणि ग्लॅमर जरासुद्धा कमी झालेलं नाही. बेबोने घातलेला हा लाल रंगाचा ड्रेस ५. ५ लाख रूपयांचा आहे. Bibhu Mohapatra यांनी हा ड्रेस डिझाईन केला आहे. शिफॉन प्रकारातल्या या ड्रेसची स्टाईल खूपच हटके होती. 5 / 10५. अलिया भट- बॉलीवूडची हॉट ॲण्ड क्यूट अभिनेत्री अलिया भट हिने घातलेला हा ड्रेस एखाद्या बार्बीसारखाच आहे.. या ग्लिटरी ड्रेसची किंमत २३ लाख रूपये असून तिने २०१८ साली झालेल्या आयफा ॲवॉर्ड सोहळ्यासाठी हा ड्रेस घातला होता. Zuhair Murad यांनी हा गाऊन डिझाईन केला होता..6 / 10६. सोनम कपूर- सोनमच्या फॅशनची आणि स्टाईलची नेहमीच चर्चा असते.. सोनमने घातलेला हा ब्लॅक सॅटीन सूट Ralph Lauren यांनी डिझाईन केला असून या ड्रेसची किंमत ४ लाख, ३६ हजार ७२८ रूपये असल्याचे सांगितले जाते. 7 / 10७. उर्वशी रौतेला- उर्वशी रौतेलाने नेसलेल्या साडीची किंमत ऐकाल तर हादरून जाल. दुबईमध्ये झालेल्या एका कार्यक्रमासाठी तिने सोन्याने काम केलेली एक साडी नेसली होती. या साठीची किंमत तब्बल ३७ कोटी रूपये एवढी होती...8 / 10८. ऐश्वर्या राय बच्चन- बच्चन परिवाराच्या सुनबाईंनी घातलेला हा गाऊन ३. ७ लाख रूपयांचा आहे. Tuxedo Gown असं या ड्रेसचं नाव असून तिने अंबानी कुटूंबात झालेल्या एका पार्टीसाठी हा खास ड्रेस घातला होता. 9 / 10९. दीपिका पदुकोन- दीपिकाने घातलेला पिंक बॉल गाऊन खरोखरंच अतिशय सुंदर होता आणि ती त्या ड्रेसमध्ये एखाद्या बाहुलीसारखी दिसत होती. Zac Posen या ब्रॅडच्या या गाऊनची किंमत ५० लाख रूपये एवढी होती. या ड्रेस तयार करण्यासाठी १६० तास लागले होते म्हणे. 10 / 10 १०. समंथा प्रभू- समंथा प्रभू नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. बॉलीवूडच्या एका लग्नसोहळ्यासाठी समंथाने हा पिवळ्या रंगाचा पंजाबी सूट घातला होता. डिझायनर अर्पिता मेहता यांनी डिझाईन केलेला हा सुट दिड लाख रूपयांचा होता.