1 / 10१. दिवाळीच्या दिवसांत प्रत्येकीला सुंदर दिसायचं असतं, प्रत्येकवेळी आपला काहीतरी हटके, वेगळा लूक असावा, असं वाटतं. पण त्यासाठी नेमकं काय वेगळं करावं, हे कळत नाही. म्हणूनच बघा बॉलीवूड अभिनेत्रींचे हे काही फेस्टिव्ह लूक..2 / 10२. हेअरस्टाईल, मेकअप कसा करावा असा प्रश्न पडला असेल, तर सोनम कपूर सारखा हा लूक करू शकता. लांब केस असतील तर ही हेअरस्टाईल छान दिसेल.3 / 10३. दिवाळीसाठी खास काठपदराची पारंपरिक धाटणीची साडी घेतली असेल, तर श्रद्धा कपूरसारखा हा ट्रॅडिशनल लूक छान दिसेल. केसांत गजरा आणि अंगावर गोल्डन रंगातले पारंपरिक दागिने तुमचा लूक नक्कीच खास बनवतील.4 / 10४. साडी जर काठपदराची नसेल, थोडी फॅन्सी किंवा डिझायनर पद्धतीची असेल, तर जेनेलियासारखा हा लूकही खुलून दिसेल.5 / 10५. दिवाळीसाठी छान लेहेंगा किंवा घागरा घालणार असाल तर केस मोकळे साेडून केलेला असा साधा- सोपा मेकअप छान दिसू शकतो.6 / 10६. अभिनेत्री करिश्मा कपूरचे हे तिन्ही फेस्टिव्ह लूक अतिशय सुंदर आहेत. ट्रेण्डी ते ट्रॅडिशनल अशा सगळ्याच पद्धतीची ड्रेसिंग स्टाईल यात दिसून येते.7 / 10७. काठपदराची ट्रॅडिशनल साडी तर नेसायची आहे, पण त्यातला लूक मात्र तोच तो टिपिकल नको, असं काही असेल तर दीपिकासारखा असा गेटअप तुम्ही करू शकता.8 / 10८. काजोलची साडी, दागदागिन्यांची निवड आणि मेकअप फेस्टिव्ह लूकसाठी अगदी परफेक्ट आहे. साडी नेसून पारंपरिकता तर जपली आहेच, पण ब्लाऊज, दागिने आणि मेकअप यांच्यातून तिने तिची खास स्टाईलही दाखवून दिली आहे.9 / 10९. सारा अली खानचा हा फेस्टिव्ह लूकही साधा- सिंपल असला तरी अतिशय आकर्षक वाटतो.10 / 10१०. मॉडेल, अभिनेत्री मॉनी राॅयची स्टाईल तर नेहमीच हटके असते. असं काही वेगळं करायचं असेल तर तिची साडी नेसण्याची पद्धत, दागिने आणि मेकअप एकदा बघून घ्या.