Join us  

'डोन्ट कॉल मी बुढ्ढी एव्हर!' - नीना गुप्ताने मसाबाला दिला दम; याद राख 3 गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2022 3:26 PM

व्हायरल व्हिडिओवर नेटीझन्सनी दिल्या एकाहून एक प्रितिक्रिया

ठळक मुद्देवय झाल्यावर प्रत्येक आई आपल्या मुलांना सांगते ही गोष्ट नीना आणि मसाबाचे नाते अनेकदा वेगवेगळ्या प्रसंगातून आपल्यासमोर आले आहे

कोणीही आपल्याला म्हातारे म्हटले तर ते आपल्याला आवडत नाही. आपले कितीही वय झाले तरी आपण तरुणच आहोत असे वाटल्याने कोणीही आपल्याला म्हातारे म्हणू नये अशी आपली इच्छा असते. प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता हिनेही तिची हिच इच्छा आपल्या मुलीला नुकतीच बोलून दाखवली. अभिनेत्री नीना गुप्ता आणि तिची मुलगी अभिनेत्री मसाबा सतत काही ना काही कारणावरुन चर्चेत असतात. नुकताच मसाबाने आपली आई नीना गुप्ताचा एक व्हिडिओ सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. मसाबाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नीना आपल्या मुलीला अशी गोष्ट सांगते जी प्रत्येक आई आपल्या मुलीला आवर्जून सांगत असेल. ती म्हणजे 'मला कधी म्हातारी म्हणू नकोस.'

सगळ्यांनीच मोठ्या आनंदाने नवीन वर्षाची सुरुवात केली. बॉलिवूड सितारेही यापासून दूर नाहीत. पार्ट्यांचे आयोजन करत त्यांनी नवीन वर्षाचे स्वागत केलेले पाहायला मिळाले. मसाबाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आपल्या आईला तिचे नवीन वर्षाचे संकल्प आणि गिफ्टबद्दल विचारले. तेव्हा नीनाने मसाबाला तीन गोष्टींचे वचन दे असे सांगितले. या तीन गोष्टी कोणत्या हे सांगताना  ती म्हणते, “मला वचन दे की तू माझ्यावर कधीही ओरडून बोलणार नाहीस, तू मला कधीही म्हातारी म्हणणार नाहीस आणि तिसरे जे सगळ्यांना माहित आहे ते म्हणजे आयुष्यात हळूहळू आणि स्थिरपणे पुढे जात राहशील.” कॅप्शनमध्ये मसाबा म्हणते, मी आईला नवीन वर्षाच्या संकल्पांविषयी विचारले होते, तिने ते तर सांगितले नाहीच पण मी तिच्यासाठी काय करायला हवे हे मात्र आवर्जून सांगितले. नीना गुप्ताचा हा व्हिडिओ अगदी कमी वेळात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. नेटीझन्सबरोबरच सेलिब्रिटीही या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. नीना गुप्ताचे कौतुक करतानाच सगळ्या आई अशाच का असतात असा प्रश्नही काही जणांनी विचारला आहे.   

(Image : Google)

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अनु रंजन हिने या पोस्टला प्रतिक्रिया देताना गमतीने म्हटले आहे की मॅस तू तिच्या मैत्रीणींनाही बुढ्ढी म्हणायचे डेअरींग करशील? तेव्हा मसाबाने त्यावर नाही करणार असे उत्तर दिले आहे. मसाबाने नुकतेच आपल्या आईबद्दलच्या अनेक गोष्टी आपल्याला माहित नसल्याचे म्हटले होते. नीना गुप्ता यांचे नुतकेच ‘सच कहू तो’ हे आत्मचरीत्र प्रकाशित झाले. माझा जन्म झाला तेव्हा आईकडे एकही पैसा नव्हता, हॉस्पिटलचे बील भरायलाही आईकडे पैसे नव्हते हे या पुस्तकात वाचल्यावर मला कळाले आणि मला धक्का बसला होता असे मसाबा म्हणाली. 

 

टॅग्स :पालकत्वनीना गुप्ता