No time for lunch or dinner? then this habbit will kill you! | वाट्टेल तेव्हा जेवता? जेवणाची वेळ कायम चुकते?- मग पुढे धोका आहे..
वाट्टेल तेव्हा जेवता? जेवणाची वेळ कायम चुकते?- मग पुढे धोका आहे..

ठळक मुद्देनिसर्ग नियम पाळतो, तर आपण का पाळू नये?

सखी ऑनलाइन टीम

रोज उठून काय स्वयंपाक करावा, नाष्ट्याला काय करावं? असे खाण्यासंबंधीचे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. पण काय खावं या प्रश्नाइतकाच महत्वाचा अजून एक प्रश्न आहे, कधी  खावं? मुळात अनेक आजाराचं मूळ हे चुकीच्या वेळी चुकीचं खाणं हे असतं. त्यामुळे काय खावं यासोबतच कधी जेवावं हा मुद्दाही प्रत्येकानं गंभीरपणे घेण्याची गरज आहे. 

जेवण कधी करावं?

* वेळेवर खाणं आवश्यक असलं तरी जेवणाची वेळ घडय़ाळ्यावरुन ठरवू नये, तर शरीराच्या जैविक घडय़ाळ्यानुसार ठरवावी आणि जैविक घडय़ाळ मात्र भिंतीवरील घडय़ाळ्याप्रमाणे नियमित चालेल याची सवय लावावी.
* पहिलं अन्न पूर्ण पचलं आहे, त्याची पावती म्हणून शुद्ध ढेकर आला आहे,  भुकेची संवेदना झाली आहे, शरीराला हलकेपणा आहे अशावेळीच  पुढचा आहार घ्यावा.
* पहिलं सेवन केलेलं अन्न पचलं नसताना, जेवणाची इच्छा नसताना, शरीर जड असताना किंवा जेवल्यानंतर पुन्हा सतत काहीतरी तोंडात टाकत राहणं या सवयींमुळे रोगांना आमंत्रण मिळतं. पचनशक्तीवर अतिरिक्त ताण येतो. 

भूकेचा आदर करा!

सकाळी 9 वाजले की न्याहारी घ्यावी.  घडय़ाळ्यात 12 वाजले की जेवायला बसावं असं न करता भुकेची संवेदना झाल्यावर खावं हेच योग्य. पण ही संवेदना मात्र वेळेवर होईल याची सवय शरीराला स्वतर्‍च स्वतर्‍ला  लावावी लागते. 
आपल्या शरीरातील जैविक घडय़ाळही खरं तर आपलं कार्य बिनचूक करीत असतं.  सकाळ झाली की येणारी जाग, सूर्य डोक्यावर आल्यावर लागणारी भूक आणि रात्र झाली की मिटायला लागणारे डोळे याचंच प्रतिक आहे. आपण मात्र त्याकडे दुर्लक्ष करतो आणि वेळा चुकवत राहतो. फलस्वरुप अनेक आजारांचं ओझं आयुष्यभर खांद्यावर वाहत राहतो. 

जेवणाची वेळ का पाळावी?

* आहाराची वेळ नियमित असेल तर नेमक्या त्याच वेळी पाचकस्त्राव स्त्रावतात. अन्नाचं पचन होतं. खाल्लेलं अन्न अंगी लागतं. योग्य वेळ नसतांना जेवल्यास पूर्णपाचक स्त्राव येत नाहीत. अन्नाचं योग्य पचन होत नाही. याउलट जेवणाची वेळ निघून गेल्यास स्त्राव ठरलेल्या वेळी स्त्रवतात पण  तेव्हा पोटात अन्न नसतं. परिणामी ते स्त्राव स्त्रवून गेल्यावर, जेवणाची वेळ उलटून गेल्यावर घेतलेल्या अन्नाचंही पूर्णतर्‍ पचन होत नाही. म्हणूनच जेवणाच्या वेळा जरी आपल्या सोयीनुरुप किंवा व्यवसायानुरुप ठरवल्या तरी जे ठरवलं आहे ते नियमित ठेवून त्यांचं पालन करावं.

Web Title: No time for lunch or dinner? then this habbit will kill you!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.