Join us  

स्वत:ला होणारा एन्झायटीचा त्रास कसा ओळखायचा? बघा समीरा रेड्डी सांगतेय एन्झायटीची ५ लक्षणं आणि त्यावरचे ५ उपाय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2023 11:17 AM

World Mental Health Day आपल्यालाही एन्झायटीचा त्रास होत आहे, किंवा आपण एखाद्या गोष्टीचा ताण घेतल्याने आपल्याला काही त्रास होतो आहे, हे बऱ्याचदा लक्षातच येत नाही. त्यामुळेच त्याची नेमकी लक्षणं काय हे जाणून घेणं गरजेचं आहे. (symptoms of Anxiety and solutions for how to release it)

ठळक मुद्देएन्झायटीचा त्रास ओळखण्याची लक्षणं आणि त्यावरचा उपाय याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ अभिनेत्री समीरा रेड्डी हिने सोशल मिडियावर शेअर केला आहे.

वाढलेली स्पर्धा किंवा प्रत्येक गोष्टीत करावा लागणारा संघर्ष, बदललेली मानसिक वृत्ती अशा अनेक गोष्टी सध्याच्या तणावपूर्ण वातावरणासाठी कारणीभूत आहेत. त्यामुळे अभ्यास, करिअर, नोकरी, कुटूंब, नातेसंबंध, मैत्री, अर्थार्जन अशा अनेक वळणांवर कोणत्या ना कोणत्या कारणाने काही जणांना सतत ताण येतो. एखाद्या गोष्टीचा सतत ताण घेऊन आपल्या शरीरात अनेक नकारात्मक बदल होत जातात. पण ते नेमके कशामुळे होतात हेच अनेकांच्या लक्षात येत नाही (Sameera Reddy told about the symptoms of Anxiety). मुळात आपल्याला एन्झायटीचा त्रास होतो आहे किंवा स्ट्रेसमुळे आपल्याला अमूक त्रास होत आहेत, हेच त्यांना समजत नाही. म्हणूनच एन्झायटीचा त्रास ओळखण्याची लक्षणं आणि त्यावरचा उपाय (remedies for how to deal with anxiety) याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ अभिनेत्री समीरा रेड्डी हिने सोशल मिडियावर शेअर केला आहे. (How to release stress?)

 

एन्झायटीची लक्षणं कोणती?

प्रत्येक व्यक्तीनुसार एन्झायटीची किंवा खूण ताण घेतल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणं वेगवेगळी असतात. पण साधारणपणे पुढे सांगितलेली काही लक्षणं थोड्या- फार फरकाने प्रत्येकामध्येच आढळतात. 

१. श्वास खूप लवकर लवकर घेणे

२. धाप लागल्यासारखे किंवा दम लागल्यासारखे होणे

'या' एका कारणासाठी आलियाने स्वत:च्या लग्नात नेसली होती साडी, तिला घागरा नको होता कारण.......

३. हृदयाचे ठोके वाढल्यासारखे जाणवणे

४. मनात खूप नकारात्मक विचार येणे आणि कितीही दुर्लक्ष केलं तरी ते विचार डोक्यातून न जाणे

५. खूप एकटं एकटं आणि उदास वाटणे

वर सांगितलेले त्रास काही सेकंदापासून ते १५- २० मिनिटांपर्यंत जाणवतात. काही जणांना तर त्यापेक्षा अधिक काळही हा त्रास होऊ शकतो. 

 

एन्झायटीचा त्रास कमी करण्यासाठी उपाय

१. श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा आणि शक्य तेवढे दिर्घ श्वसन करा.

२. मनातल्या मनात उलटे आकडे मोजा

ट्विंकल खन्नाने केली एक जादू आणि जुनी जीन्स झाली एकदम स्टायलिश- हटके, बघा नेमकं काय केलं तिने.....

३. जोरात रडा, मोठ्याने ओरडा आणि मनातली सगळी घुसमट बाहेर काढा

४. मनातल्या मनात कुढत बसू नका. तुमच्या त्रासाविषयी कुणाशी तरी मोकळेपणाने बोला.

५. वारंवार हा त्रास होत असेल तर मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेण्यास मागेपुढे बघू नका.

 

टॅग्स :मानसिक आरोग्यसमीरा रेड्डी