Join us  

खूप स्ट्रेस आलाय, लाइफ आऊट ऑफ कण्ट्रोल? फक्त या १० गोष्टी करा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:15 PM

स्ट्रेसच नाही अशी व्यक्ती जगात सापडणार नाही, पण स्ट्रेस नेमका कशाचा आला आणि काय केलं तर कमी होईल हे तरी शिकून घ्यायला हवं..

ठळक मुद्देस्ट्रेस कमी करायच्या तर या दहा गोष्टी करायव्या लागतात. जमतील तुम्हाला आधी एकानं तर सुरुवात करा.

पूनम घाडीगावकर

मला स्ट्रेस नाही असं म्हणणारी व्यक्ती जगात सापडणार नाही. ज्याला त्याला/जिला तिला स्ट्रेस आहेच. सतत ताण, सतत स्ट्रेस. आणि मोठ्याच नाही तर अनेकांना लहानसहान गोष्टींनीही स्ट्रेस येतो आणि मग ते आपल्यासमोर असलेली परिस्थिती चांगली सांभाळू शकत नाही. आणि ते जमत नाही म्हणून अजून त्यांचा स्ट्रेस वाढतो.तरीही सगळं ठीक असतानाही काहीजणांना स्ट्रेस येतोच.काही व्यक्ती अवास्तव आणि परिपूर्णतावादी अपेक्षा ठेवतात. स्वत:कडून आणि इतरांकडूनही. मनाला अस्वस्थ करणारी विचारसरणी (चिंता), नोकरीतली असुरक्षितता, आरोग्य आणि वैद्यकीय चिंता, कौटुंबिक कलह,पर्यावरण प्रदूषण आणि सामाजिक आव्हानं असे अनेक प्रश्न.त्यात आता हा कोवीड. त्यामुळे अनेक जणांना स्ट्रेस आलेला आहे. भविष्यातील घटनांबद्दल काळजी वाटणं, आपल्याला किंवा आपल्या प्रियजनांना कोविड होईल की काय याची सतत चिंतायाचाही ताण येतोच.त्यातून अनेकांची तब्येत बिघडते.  डोकेदुखी, अंगदुखी, छातीत दुखणे, श्वसनाला त्रास, झोपच न येणे किंवा खूप येणे, सतत चिंता वाटते, चिडचिड होते. स्वतभाव रागीट होतो.

आता प्रश्न असा की हा स्ट्रेस आपण कसा घालवायचा?

एक नक्की आपण आपल्या आयुष्यात येणार तणाव टाळू शकत नाही. हे आधी मान्य करायला हवं. मात्र तणावनियंत्रण ही एक कला आहे. हे शिकून घ्यायला हवं.

ते कसं कराल?

१. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या नियंत्रणात काय आहे आणि माझ्या नियंत्रणाबाहेरकाय आहे याचा आपण नक्कीच विचार करायला हवा. बऱ्याचदा आपण अशा गोष्टींची चिंता करतो ज्यात आपण फार बदल करूच शकत नाही. जसे की एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे बदलणे, आपल्यामनासारखे वागायला लावणे, आपल्या सारखा विचार करायला सांगणे, इतरांनी माझ्याशी कसेवागावे, बोलावे, माझ्याबद्दल कसा विचार करायला हवा, आपल्या सोयी प्रमाणे परिस्थितीअसावी, बाह्य परिस्थिती बदलायला हवी, इत्यादी. २. तुम्ही हे पहा की आपल्या नियंत्रणात काय आहे. तुमच्या भावना, तुमची कृती, तुमचे वागणे, तुमचे विचार , तुमच्या कल्पना, तुमच्या प्रतिक्रिया यात तुम्ही सकारात्मक बदल करू शकता जे तुमच्या हातात आहे..३. कोवीड मुळे जी परिस्थिती आपल्या सगळ्यांवर ओढवलेली आहे त्यामुळे आपण सगळेच तणावाखाली आहोत. मग माझ्या नियंत्रणात काय आहे जितकी जमेल तितकी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायला हवी हे माझ्या नियंत्रणात आहे. ते तेवढेच आपण करु शकतो.

४. अनेक व्यक्ती काही नकारात्मक गोष्टी चुइंगम सारख्या चघळत राहतात, त्याचबद्दल सतत विचार करत राहतात, बोलत राहतात आणि मग तणाव निर्माण व्हायला लागतो आणि मग त्याची शारीरिक व्याधी कधी बनते हे आपल्याला काळतच नाही. काही गोष्टी चॉकलेट सारख्या पटकन संपवायच्या असतात हे आपल्याला कळले पाहिजे.५. जेव्हा तुम्हाला तणाव जाणवायला लागतो तेव्हा बाहेर चालायला जा, व्यायाम करा,मेडिटेशन करा.६. कामाचे व्यवस्थापन करा, शक्यतो आजचे काम आज करा, उद्यावर टाळू नका.७. दीर्घ कालीन ध्येय जरी असले तरी लहान लहान ध्येय बनवा. ते पूर्ण झाले की आनंद व्यक्त करा, साजरा करा स्वत:साठी.८. आपल्या भावना, विचार आणि कृती याची योग्य सांगड घाला९. नेहमीच स्वतःशी सकारात्मक बोला कारण मेंदू, शरीर आणि आत्मा याची गट्टी असते. त्यामुळे मेंदूला योग्य सूचना द्या. मग ते सगळे नीट काम करतात. १०. स्ट्रेस कमी करायच्या तर या दहा गोष्टी करायव्या लागतात. जमतील तुम्हाला आधी एकानं तर सुरुवात करा.

(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहेत.)दिशा कॉउंसेलिंग सेंटरwww.dishaforu.com

टॅग्स :मानसिक आरोग्य