मनात आहे नुसतं पण बॉडी नाही म्हणते हा अनुभव आपण सगळेच घेतो.(Mental Health) पण बॉडी अजिबात साथ देत नसताना आपण कसं ठाम उभं राहायचं आणि मनाच्या पूर्ण ताकदीने लढायचं याचं उत्तम उदाहरण म्हणजे ऋषभ पंत.(Rishabh Pant Pain to Performance) पायाला फ्रॅक्चर असतानाही तो खेळू शकतो ते मनाच्या ताकदीवर. (rishabh pant injury played)
ऋषभ पंतचा क्रिकेट करिअरमधला प्रवास हा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.(Rishabh Pant Latest News) सामान्य कुटुंबातून आलेल्या ऋषभचा प्रवास काही सोपा नव्हता. उत्तराखंडमधील रुडकी या छोट्याशा गावात राहत असलेल्या ऋषभला फार लहान वयात क्रिकेटची आवड जडली.(Inspiring Cricket Stories) आपल्या स्वप्नांसाठी त्यांने घरदार सोडून दिल्लीत स्थालंतर केलं. दिवसरात्र मेहनत, अपयश आणि परिस्थितीशी झगडत त्यांने क्रिकेटच्या मैदानात धाव घेतली.(Cricket Motivation Story) २०१६ साली अंडर-१९ वर्ल्ड कपमधील कामगिरीमुळे भारतीय संघात त्याची निवड करण्यात आली. सुरुवातीच्या काही काळात त्याला अपयश आले पण परिस्थितीशी दोन हात करत त्याने हार मानली नाही. आणि अपघातानंतर त्यानं केलेलं कमबॅक तर सर्वांनाच माहिती आहे.
Women and stress: बायका खूप चिडचिड का करतात, सतत इतक्या कुणावर वैतागलेल्या असतात?
२०२२ साली एका कार अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली. आपलं करिअर संपतंय की काय? अशी भीती त्याच्या मनात दाटून आली होती. तब्बल १५ महिने क्रिकेटपासून दूर राहणं त्याला अवघड झालं होतं. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खचल्यावरही तो हरला नाही. तब्बल १५ महिन्यानंतर ऋषभने पुन्हा एकदा मैदान गाजवलं. सध्या सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये पंतच्या पायाला दुखापत झाली. त्याला निदान सहा आठवडे तरी खेळता येणारं नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे सुरु असलेल्या चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ऋषभ फलंदाजी करत होता. त्यांच्या उजव्या पायाच्या बोटाला दुखापत झाली. वेदना इतकी जास्त होती की, त्याला साधं उभं ही राहता येतं नव्हतं. त्याला या दुखापतीतून बरे होण्यासाठी किमान २ महिने तरी लागतील असं डॉक्टरांचं मत. पण संघाची गरज ओळखून तो परत मैदानात उतरलाच. त्यानं बॅटिंग केली.
भागे रे मन...! डोक्यात सतत विचारांचा भुंगा? ७ सोपे उपाय, ओव्हिरथिंकिंग थांबेल, मन होईल शांत
तो मैदानात आला तेव्हा भारतासह इंग्लंडच्या फॅन्सनी उभं राहून त्याच्या नावाची घोषणा द्यायला सुरुवात केली. वेदना किती जरी होत असल्या तरी तो उभा राहिला. शारीरिक फिटनेससह मानसिक बळाची आणि इच्छाशक्तीची ही परीक्षा होती. ती त्यानं दिली. अनेकदा शरीर साथ देत नसतानाही केवळ मानसिक ताकदीवर केलेला संघर्ष सरस ठरतो याचंच ते उदाहरण. मनानं ठरवलं तर काय अशक्य आहे.