Lokmat Sakhi >Mental Health > म्हणा, मै अपनी फेवरिट हूं! ओळखा नक्की कशी आहे तुमची पर्सनॅलिटी? कुछ तो खास है..

म्हणा, मै अपनी फेवरिट हूं! ओळखा नक्की कशी आहे तुमची पर्सनॅलिटी? कुछ तो खास है..

आपल्यात काहीच भारी नाही, आपलं व्यक्तिमत्त्व आकर्षक नाही म्हणून चिडू नका, शोधा आपल्यात भारी काय आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2022 05:29 PM2022-05-06T17:29:31+5:302022-05-06T17:34:41+5:30

आपल्यात काहीच भारी नाही, आपलं व्यक्तिमत्त्व आकर्षक नाही म्हणून चिडू नका, शोधा आपल्यात भारी काय आहे.

know exactly how is your personality facts about personality type | म्हणा, मै अपनी फेवरिट हूं! ओळखा नक्की कशी आहे तुमची पर्सनॅलिटी? कुछ तो खास है..

म्हणा, मै अपनी फेवरिट हूं! ओळखा नक्की कशी आहे तुमची पर्सनॅलिटी? कुछ तो खास है..

Highlights आपलं व्यक्तिमत्त्व वाईट नसतं, त्यातल्या त्रुटी कमी करुन आहे ते गुण आपल्याला जास्तीत जास्त वापरता यायला हवेत.

मला ना अशी पर्सनॅलिटी पाहिजे होती. काय आपला अवतार, आपल्याकडे काहीच भारी नाही. ती अमकी तिची, कसली भारी पर्सनॅलिटी आहे नाहीतर आपण? आपल्याला नाही बाई जमत तिच्यासारखं रहायला असं बायका किती सहज म्हणतात. तुम्हाला कुणाचं व्यक्तिमत्व आवडतं असा प्रश्न कुणी विचारलाच तर उत्तर हमखास दुसऱ्या कुणाचं येतं किंवा सेलिब्रिटींचं. पण मै अपनी फेवरिट हूं असं म्हणतो का आपण? मग आपण हे स्वत:चं फेवरिट कसं बनता येईल?
तसं पाहिलं तर ‘पर्सनॅलिटी’ हा फार परवलीचा शब्द. अमूकची डॅशिंग आहे, तमूकची अट्रॅक्टिव्ह आहे, ढमूकची एकदम इम्प्रसिव्ह आहे अशी चर्चा सतत होते. आपणही आपल्याला आवडणाऱ्या  माणसांच्या व्यक्तिमत्वातल्या अनेक गोष्टी कॉपी करण्याचा प्रयत्न करतो. मात्र आपली पर्सनॅलिटी कशी आहे हे आपल्याला माहिती नसतं. आणि मग अनेकदा कुणीतरी आपल्याविषयी काहीतरी बोलतो तेव्हा आपण म्हणतो की, अशी मी नाहीच. प्रत्यक्षात मात्र तसं असतं.
आपण काय बोलतो, काय करतो, कुठल्या गोष्टींकडे आकर्षित होतो, या सर्व निर्णयांवर आपलं व्यक्तिमत्त्व आकार घ्यायला लागतं. काही गोष्टी जन्मत: मिळतात, मात्र व्यक्तिमत्व उत्तम घडवताही येऊ शकतं. बघा, अवतीभोवती म्हणता म्हणता त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा कायापालट केलेला दिसतो.
पण ते करायचं तर मुळात आपली पर्सनॅलिटी कशी आहे हे ओळखायला हवं.

(Image : Google)

कशी आहे तुमची पर्सनॅलिटी?

1.आपलं व्यक्तिमत्व कसं आहे हा प्रश्न आपणच स्वत:ला विचारायला हवा. आपल्या मधले महत्त्वाचे गुण कोणते, याची यादी करा. तुम्ही शांत स्वभावाचे आहात की तापट, अबोल आहात की बडबडे, लोकांबरोबर पटकन मिसळता की ओळख व्हायला वेळ लागतो, विचारपूर्वक निर्णय घेता की जे सुचेल ते करुन मोकळे होता? हे असे प्रश्न स्वत:ला, आपल्या अवतीभोवतीच्या माणसांना विचारा, स्वत:ला समजून घ्या.
२.हल्ली भरपूर ऑनलाइन पर्सनॅलिटी टेस्ट उपलब्ध आहेत, त्याही मोफत त्याही करुन पहायला हरकत नाही. त्यातून स्वत:विषयी काही अंदाज घेता येईल.
३. आपला स्वभाव अमूक प्रकारचा आहे आणि अमूक आपल्या स्वभावात त्रुटी आहे हे लक्षात आलं की ते स्वीकारा.

(Image : Google)

४. आपलं व्यक्तिमत्व असंच का आहे म्हणून भांडत बसू नका. कारण प्रत्येक प्रकारची पर्सनॅलिटी ही उत्तमच असते, आपण फक्त तिचा वापर करुन घ्यायला शिकलं पाहिजे. जितक्या लवकर सुरुवात कराल तितकं आपलं व्यक्तिमत्व उत्तम बनवाल आणि यशस्वी व्हाल!
५. आपलं व्यक्तिमत्त्व वाईट नसतं, त्यातल्या त्रुटी कमी करुन आहे ते गुण आपल्याला जास्तीत जास्त वापरता यायला हवेत.

Web Title: know exactly how is your personality facts about personality type

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.