Join us  

तुम्ही स्वत:ला कमी लेखता ? आपण ‘न-लायक’ आहोत असं समजता? मग लोक तुम्हाला भाव नाहीच देणार..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 1:47 PM

इतरांना आपल्याविषयी काय वाटतं हा प्रश्न महत्वाचा नाही, आधी आपल्याला आपल्याविषयी काय वाटतं, आपण आपला आदर करतो का या प्रश्नाचं उत्तर द्या, ते ही स्वत:ला!

ठळक मुद्देस्वत्व जपा, जोपासा! ते वाढले की यश आपलेच.

समिन्दरा हर्डिकर-सावंत

आई कुठे काय करते, असं ऐकलं तरी मन दुखतं मात्र इतरांनी आपल्या कामाचा किंवा आपला आदर करण्याआधी, आपण स्वत:चा आदर करतो का? स्वत:ला आपल्याला वाटतं का? की आपण महत्वाचं काम करतो, कुणी कौतुक नाही केलं तरी चालेल, मला माझ्या कामाचा आनंद आणि अभिमान आहे. इतरांचं जाऊन द्या, इथं प्रश्न असा आहे की तुमचे स्वत:बद्दलचे मत काय आहे?त्याला म्हणतात, सेल्फ एस्टीम. आपल्याला  आपल्याविषयी असलेला आदर. आत्मविश्वास. त्यावर अनेकदाआपलं यशापयश अवलंबून असतं. स्व आदर ही एक आंतरिक भावना आहे, आणि ज्या व्यक्ती स्वत:विषयी आदर व आत्मविश्वास बाळगून असतात, त्या कामात अधिक उत्साही असतात, तणावाला अधिक सकारात्मकतेनेसामोरे जाऊ शकतात, व इतरांशी अधिक सामंजस्याने काम करू शकतात.आता हा स्वत:विषयीचा आदर वाढवायचा कसा, काय केलं तर तो वाढेल?आपण आपल्यालाच शाबास म्हणायला कसं शिकायचं? आणि आपण आपल्याला भाव दिला तर खरंच इतरही लोक देतात का..

 

करुन पहा.. हळूहळू तुमचं तुम्हाला हे कोडं सुटत जाईल..

१. तुम्हाला स्वत:विषयी आत्मविश्वास असेल तर तुम्ही कामाच्या बाबतीतअधिक उत्साही आणि कामाचा हुरूप जास्त असतो. म्हणून जे कराल ते प्रेमाने, पूर्ण विश्वासाने करा. तुम्हाला नवीन किंवा आव्हानात्मक काम करायला संकोच वाटत नाही.२. स्वत:चा मान राखला, तर आपला आप राखून तुम्ही सहकारी किंवा वरिष्ठांशी उत्तम संवाद साधू शकाल. बिचाकणार नाही.३. तुम्ही कार्यालयात सहकारी गटासोबत काम करणार असाल, टीम लीड करत असाल तरी तुमचा जरतुमच्या स्वत:च्या पात्रतेवर तर विश्वास असेल तर इतरांची गुणवत्ता पाहून तुम्हाला असुरक्षित वाटणार नाही. उलट त्यांच्या मदतीने तुम्ही उत्तम काम करु शकाल.४. जीवनात अनेक प्रसंग येतात ज्यानं आपण खचून जातो. अशापरिस्थितीत स्वत:चे आत्मबल टिकवून धरणं, हे आपले कर्तव्य आहे.ते केलं तर स्वत:चे दोष मान्य करुन, गुणांचा अधिकाधिक वापर करुन स्वत:चा आदरच नाही तर स्वत:वर प्रेमही करता येतं.

त्यासाठी काय करता येईल..

१. दिवसाच्या अखेरीस दिवसभराचे विश्लेषण करा. आपण वेगवेळ्यापरिस्थितींमध्ये स्वत:ला कसे हाताळले, काय चुका केल्या, काय योग्यकेले याचा विचार करा. अशाने तुम्हाला एक दृष्टीकोन मिळतो. आत्मविश्वास कमी होत नाही.२. तुमच्या अचिव्हमेण्ट्सची  लेखी नोंद ठेवा. लहान-मोठे जे काही यशतुम्हाला लाभते, त्याचा एक अर्थाने हिशोब ठेवा. ३. जेव्हा स्वत:वरचाविश्वास कमी होतो, या यादीकडे पहिल्याने तो खात्रीपुर्वक पुन्हा बळमिळते.४. कोणतीही नवी कामगिरी हाती घेताना आपण समर्थ आहोत का असा प्रश्नस्वत:ला विचारण्या ऐवजी “I will try my best!” असे आश्वासन स्वत:लाद्या. ५. निष्कर्षावर फोकस करण्यापेक्षा प्रयत्नांवर भर घाला.थोडक्यात म्हणजे स्वत्व जपा, जोपासा!ते वाढले की यश आपलेच. मग आपण काय काय करू शकतो याची उत्तरं आपली आपल्याला मिळू लागतात.

(लेखिका क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आहेत.)Disha Counseling Centersamindara@dishaforu.com

टॅग्स :मानसिक आरोग्य