Join us  

तुम्हाला वाटतं की लोकांनी आपल्याला मान द्यावा, आदर राखावा? ६ टिप्स, इमेज बदला-सगळं बदलेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2023 3:42 PM

6 Tips on How to Make people Respect You आपणच आपली कदर करत नसू तर इतर लोकांनी अपमान केला तर दोष कुणाचा?

प्रत्येकाला वाटते की, लोकांनी आपला आदर - सन्मान ठेवला पाहिजे. काही लोकं समाजात नाव कमावण्यासाठी शंबर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करतात. या जगात कोणीही परफेक्ट नसते. चुकीतूनच माणूस शिकत मोठा होतो. आपल्यात जी शैली आहे, त्याची लोकांनी किंमत ठेवावी, आपल्याला लोकांनी मान द्यावा असे सगळ्यांनाच वाटते.

अनेकदा आपल्याला स्वतःच्या उणिवांची जाणीव नसते. ज्यामुळे आपण त्या गोष्टींवर काम करू शकत नाही. परंतु जर आपण कमतरता ओळखून, त्यावर काम केले तर नक्कीच यश गाठू शकतो. याने तुम्ही उत्तम व्यक्ती तर बनू शकाल, यासह लोकं तुमचा सन्मान ही करतील. जर तुम्हाला तुमची मूल्य वाढवायची असेल तर, या काही भन्नाट टिप्स फॉलो करा(6 Tips on How to Make people Respect You).

संवाद

आपला संवाद आपली व्यक्तिमत्व दर्शवते. काही लोकं फक्त बोलतात, पण खऱ्या आयुष्यात त्याची अंबलबजावणी करत नाही. त्यामुळे अनेक लोकं तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात. मोजकेच बोला पण मुद्द्याला धरून बोला. ज्यामुळे लोकं इम्प्रेस होतील. क्लियर शब्दात आपले म्हणणे लोकांसमोर मांडा.

प्रत्येक गोष्ट शेअर करू नका

संवादादरम्यान, प्रत्येक गोष्ट शेअर करणे टाळा. अनेकदा आपण उत्साहित होऊन प्रत्येक गोष्ट शेअर करतो. अनेकदा या गोष्टी लोकं बाहेर जाऊन दुसऱ्या व्यक्तींना शेअर करतात. ज्यामुळे तुमचा स्वभाव, तुमचा विक पोइंट या सगळ्या गोष्टी नकळतपणे त्यांना कळतात. त्यामुळे आपल्या गोष्टी ओव्हर शेअर करू नका. याने आपली किंमत कमी होते.

एक चांगली व्यक्ती व्हा

आपल्या कमतरता ओळखून त्यावर काम करा. आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करा. तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. अशा गोष्टी करा ज्यामुळे तुम्हाला यश मिळेल. जेव्हा तुम्ही आयुष्यात काही साध्य करता तेव्हाच लोकं  तुमची कदर करतात.

टॅलण्ट असूनही आपण मागे पडतोय असं सारखं वाटतं तुम्हाला? करा ५ गोष्टी, बदलेल जगणं

इतरांवर अवलंबून राहणे टाळा

प्रत्येक गोष्ट स्वतःच्या बळावर करा. कधीही दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहू नका. जेव्हा आपण काही कामासाठी दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहतो, तेव्हा आपली किंमत कमी होते. जर तुम्ही कोणत्या तरी गोष्टीत अडकले असाल तर, व्यक्तीला विनंती करून ती गोष्ट सोडवण्याचा प्रयत्न करा. पण जर कोणी नकार दिला तर त्याच्या मागे लागू नका. कारण ही गोष्ट आपल्या स्वाभिमानावर येते.

प्रत्येक वेळी उपलब्ध राहू नका

प्रत्येक वेळी कोणासाठीही उपलब्ध राहू नका. एखाद्याच्या कामासाठी तुम्ही सतत उपलब्ध असाल तर तुमची किंमत कमी होते. या सवयीमुळे काही वेळा लोकं तुमची पाठीमागून चेष्टा करतात. त्यामुळे काही गोष्टींना नाही म्हणायलाही शिका.

नोकरीत दणक्यात यश मिळवायचं आहे? ३ मंत्र, म्हणाल त्या कामात येईल यश

ड्रेसिंग सेन्स

स्वतःच्या स्वच्छतेची काळजी घ्या. स्वच्छ कपडे घाला. नखे स्वच्छ ठेवा. ड्रेसिंग सेन्स वाढवा, कपड्यांमुळेही तुमची इमेज वाढते. 

टॅग्स :व्यक्तिमत्वमानसिक आरोग्य