Menstrual cycle: four-day cycle 'cycle' irregular? | मासिक पाळी : चार दिवसांचं ‘चक्र’ अनियमित आहे?

मासिक पाळी : चार दिवसांचं ‘चक्र’ अनियमित आहे?

ठळक मुद्देव्यायाम आणि चौरस आहार, योग्य वैद्यकीय सल्ला यानं हे चक्र नियमित होऊ शकतं.

-सखी ऑनलाइन टीम

मासिक पाळी नेहमी अनियमितच येते,  कधी तर महिनाआड येते; तसं होणं हा आजार आहे का? आणि त्याचे काही दुष्परिणाम होतात का.? असा प्रश्न अनेक मुलींना/महिलांना पडतो.
हल्ली सुमारे 80 ते 90 टक्के मुलींना अनियमत मासिक पाळीची समस्या आहे. मासिक पाळी उशिरा येणे, दर महिना आड येणे किंवा दोन महिन्यांनी येणे अशी अनियमितता मुलींमध्ये सर्रास आढळते. 
या अनियमिततेची कारणं काय.?
मुलींची सध्याची बदललेली लाईफस्टाईल हे मुख्यतर्‍ या समस्येचे कारण आहे. सतत बाहेरचं खाणं, पोषक नसलेला आहार, व्यायामाचा अभाव यामुळे बहुतांश मुलींमध्ये ही समस्या उद्भवते. पुर्वी मुली घरात काम करत असत. शरीराला त्यातून चलनवलन, व्यायाम होत असे, आता घरकाम अतिशय कमी झालं. पायी चालणंही बंद त्यामुळे शरीराची हालचाल कमी होते. पोटाला तर अजिबातच व्यायाम मिळत नाही.
हे सारं एका दिवसात घडलं असं अजिबात नाही. दोन-चार वर्षे हे सतत असंच घडत राहतं आणि त्यातून मासिक पाळी अनियमित होण्याची तक्रार सुरू होते.

या समस्येवर उपाय काय?


1. आपली बदललेली जीवनपद्धती सुरळीत करणे हा या समस्येवरचा पहिला उपाय. 

2. मात्र सतत मासिक पाळी अनियमित असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 
3. आपल्या आहारात तातडीने बदल करावा. वजन वाढणार नाही याची काळजी घ्यावी. हॉटेलमधले खाणे, फास्ट फूड, खूप तेलकट-तूपकट पदार्थ कमी करावे. 


4. रोज वेळा ठरवून पोषक आणि चौरस आहार घ्यावा. पोषक आहाराचा अभाव आणि अशक्तपणा हे देखील अनियमिततेचं कारण असू शकतं. 
5. व्यायाम सुरू करावा.  पुरेसा व्यायाम आणि योग्य आहार यातून ही अनियमितता दूर करता येऊ शकते.


6. मात्र हे सारं करत असतांना वैद्यकीय सल्ला घ्यावा. जर अनियमिततेची सुरूवात असेल तर ठिक पण तसे नसेल तर औषधोपचारांची गरज पडू शकते. मात्र समस्या मोठी आणि दीर्घकाळ असेल तर मात्र औषधोपचार करावेच लागतात.


7. तुमचे चक्र नियमित व्हायला हवे असेल तर  चौरस आहार, हॉटेलात -बाहेर खाणं बंद, फास्ट फूड बंद, तेलकट-अतिकोरडे पदार्थ खाणं बंद, रोज नियमीत व्यायाम, रोज किमान दहा सूर्यनमस्कार घालणे, चालायला जाणे. हे एवढं तरी करायलाच हवं. आपली जीवनशैली सुधारणं हे या अनियमित चक्रावरचं मोठं उत्तर आहे. आणि यासोबतच वैद्यकीय सल्ला घेणंही अत्यंत आवश्यक आहे.

Web Title: Menstrual cycle: four-day cycle 'cycle' irregular?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.