in Lockdowns kids turns into kitchens .. How? | लॉकडाऊनमुळे  मुलं वळता आहेत स्वयंपाकघराकडे.. ती कशी?

लॉकडाऊनमुळे  मुलं वळता आहेत स्वयंपाकघराकडे.. ती कशी?

- भक्ती सोमण

मार्च, एप्रिल  हे दोन महिने लक्षात राहतात ते परीक्षेसाठी.  दहावी बारावीच्या परीक्षेपासून सर्वच इयत्तांच्या परीक्षा या काळात असतात. त्यामुळे मुलांबरोबर त्यांच्या घरच्यांनाही एक ताण असतो. याकाळात आई मुलांच्या जेवणाची विशेष काळजी घेते. त्यांना पौष्टिक खायला देते. इतकी र्वष हेच तर चालत आलं होतं. पण सध्या शाळा कॉलेजच्या परीक्षेऐवजी तुम्हा आम्हा सर्वांच्या जीवाची  ‘कोरोना व्हायरस’ परीक्षा घेतोय. आणि या परीक्षेत 100 टक्के घरात राहून पास होणं महत्वाचं आहे. यासाठीच शासनानं देशात लॉकडाऊन केलं आहे.  आणि त्यामुळेच फक्त रविवारीच घरी सापडणारं संपूर्ण कुटुंब पूर्ण 21 दिवस घरीच असणारे. त्यातले काहीच दिवस उरले असले तरी हा टास्क सोपा करण्यासाठी आई, आजीला खिंड लढवावी लागत आहे.
आता हेच बघाना. रविवारचा एक दिवस सुट्टी असल्यानं घरातल्या सर्वाच्याच खायच्या कितीतरी डिमांड असतात. सगळ्यांच्या मनासारखं व्हावं म्हणून आई बाबा, आजी रविवारी मस्त बेत करत असतात.   ‘रोज पोळी- भाजीच काय गं आई आज काहीतरी वेगळं कर’  असं ऐकू येतंच. पण आता परिस्थिती बदलली आहे. इथे सर्वजण 24 तास घरी असल्यानं आई आजीला नाश्त्याला, दोन वेळच्या  जेवायला काय करायचं हा प्रश्न पडतो आहेच. हे प्रश्न त्या अत्यंत कौशल्यानं सोडवतही आहेत. पण प्रश्न आहे तो मुलांचा. मुलांना कसं गुंतवून ठेवायचं? ही समस्या घरोघरी पालकांना सतावते आहे. 
माझ्यासकट सगळ्या आयांना या प्रश्नानं त्नास दिला. आणि हो त्यावर उपायही आपसूकच मिळाला. तो कसा तर चित्नकला, हस्तकला, मातीकाम, वाचन,  थोडा अभ्यास हे करता करता मधेच भूक लागल्याची जाणीव झाली की आई काय करतेय बघायला मुलं स्वयंपाक घरात येतात आणि  तिच्यासारखं आपणही शिकावं असं उत्स्फूर्तपणो वाटून घरात आईला मदत करण्याचं प्रमाण या निमित्तानं खूप वाढतंय. आता हेच पहाना, माझा तिसरीतली मुलगा मला बघून पोळी लाटायला दे म्हणत पाठी लागला आणि पोळी लाटायलाही शिकला, आठवड्यातून 2 दिवस 5 पोळ्या गोल लाटून देतो, गेल्या आठवड्यात पोहे करण्यासाठी मदत केली, फ्रेंच फ्राईज साठी बटाटे धुवून सोलून, मशिनमधून कापून देणो अशा काही गोष्टींत तो मला हातभार लावतो. हे माझ्या घरचं चित्र आज अनेक घरांमध्ये दिसयला लागलंय हे सोशल मीडियावरून कळतंय.  त्यात एकूण आईंचा सूर मुलांना प्रोत्साहन दिलं की ते आवडीनं शिकतात हा होता. लॉकडाऊनमुळे हा फायदा झाल्याचं आया कौतुकानं सांगताय. 
तिसरीतली जिया फराटे चहा करायला शिकलीय.  रोज पोळ्या लाटून द्यायला आईला मदत करते, सिनियर मध्ये असल्यापासून ती भेळ, सँडविच असे पदार्थ शिकली होती, पण आता मिळालेल्या मोठ्या सुट्टीत ती मोमोज शिकली.  तिला  गॅसही पेटवता येतो. तो पेटवताना काय काळजी घायची याच्या आईनं दिलेल्या  सूचना ती तंतोतंत पाळते. आपण मुलांना करू द्यायला हवे त्याशिवाय त्यांना येणार नाही असं तिची आई प्राची सांगते. 
पहिलीतला नचिकेत पुरोहित सध्या कणीक मळणं आणि पोळ्या लाटणं यासाठी आईला रोज मदत करतोय. 4 दिवसात त्याला कणिक ब-यापैकी मळता यायला लागलीय. आपण केलेली पोळी खाताना त्याला खूप आनंद मिळाल्याचं तो सांगतो. एवढंच नाही तर आता पापड लाटायलाही आईला तो मदत करतो. 


पाचवीतली आर्या जोशी रोज एक पदार्थ करते.  तिला आईचं बघून कुकिंग करायला आवडायला लागलं. आईला मदत होत असल्यानं या काळात तिनं पोळी, पु-या, बटाट्याची भाजी, पनीरची भाजी असे पदार्थ केले. आहे त्या सामानातून पोटभरीचे अन पौष्टिक पदार्थ आता ती शिकतेय.  ‘या वयातल्या मुलांच्या स्वयंपाकघरातल्या लुडबुडीला आईनं योग्य वळण लावलं तर भविष्यात ही मुलं नक्कीच सुगरण होण्यास पात्न ठरतील’, असं तची आई लीना म्हणते. 
ऋचा आणि  ऋग्वेद पोतनीस ही भावंड मिळून पोळी करतात, ¬चा कणकि मळायला शिकलीय तर ऋग्वेद पोळी लाटून आईच्या देखरेखीखाली भाजतोही. शिवाय शिकरण, खीर यासारखे पदार्थही  ही भावंडं मिळून करतात.  ‘ दिवसाचे 10 तास बाहेर असणा-या  आयांसाठी ही सुवर्णसंधीच होती. आणि  तसेही कामवाली मावशी नसल्यानं मुलांना लाइफ स्किल्स शिकवण्यासाठी हीच ती योग्य वेळ होती, ज्यासाठी मला मुलांचं मन वळवण्याची गरज पडली नाही!’ असं  ऋचा अन ऋग्वेदची आई अबोली पोतनीस यांनी सांगितलं.   ‘ आम्ही दोघांनाही जाणीव करून दिली की आजचा स्वैपाक तुम्ही करणार आहात. जसा होईल तसा आपण सगळे आवडीनं खाऊ.’  मग मुलानं जबाबदारीनं भाताला किती पाणी लागतं, भाजीला किती मीठ लागतं हे समजून घेतलं. पुढच्या दिवशी स्वत:च्या अंदाजानं तो आमटी भात करू शकला.’ असंही  अबोली म्हणाल्या.
सातवीतला हर्ष ओक याच काळात डोसे करायला, चहा करायला शिकलाय. तर दुसरीतली त्याची बहीण परी पोळ्या करायला शिकतेय. 
लहानपणापासून आईनं स्वयंपाक करायला प्रोत्साहन दिल्याचा फायदा आता खूप होत असल्याचं वेदांती मोडक सांगते, सातवीतली वेदांती आता पूर्ण स्वयंपाक करू शकते. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात रोज एका वेळी काहीतरी स्पेशल करण्याकडे तिचा कल असतो. सध्या केक, कपकेक्स करण्याकडे तिचा ओढा वाढलाय. सगळेच घरात असल्यानं खाऊ करायला जास्त मजा येते असं ती सांगते.
ही आणि  अशी कितीतरी मुलं यानिमित्तानं स्वयंपाक शिकत आहेत. त्यात त्यांचा थोडा वेळ जात असल्यानं कंटाळा कमी होतोय आणि नवं शिकल्यानं त्यांचं होणारं कौतुक त्यांना सुखावतं आहे. उद्या कितीही अडचण आली किंवा परदेशात शिकायला गेली, स्वतंत्न राहू लागली तर स्वत:च स्वत: करून ती खाऊ शकतात हा विश्वास यानिमित्तानं आयांना मिळू लागलेला आहे. 
------++-----मुलांना सहज करता येण्यासारखे पदार्थ

चपाती चिप्स
साहित्य :- चार चपात्या  , पाव चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर, पाव चमच्यापेक्षा कमी मीठ, आवश्यकते नुसार तुप,3 चमचे बारिक चिरलेली कोथिंबीर आणि चीझ. 
कृती : प्रथम तयार चपातीचे त्रिकोणी छोटे तुकडे करून घ्यावे. मग तव्यावर तुप टाकून  हे तुकडे दोन्ही बाजूनं कडक करून घ्यावे,नंतर  एका ताटलीमधे सर्व चपातीच्या कुरकुरीत तुकड्यांवर मिरची पावडर, आमचूर पावडर, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि किसलेलं चीझ घालावं. की मस्त कुरकुरीत चमचमीत चपाती चिप्स तयार.

पापड चाट
साहित्य: 3 पापड (उडीद/ पोहा/बटाटा), एक मध्यम वाटी बारीक चिरलेला कांदा, टॉमेटो आणि कोथिंबीर, अर्धा चमचा चाट मसाला, तळलेले शेंगदाणो, पाव चमचा मिरची पावडर, एक चमचा  लिंबू रस आणि पाव चमच्यापेक्षा कमी मीठ.
कृती :  वर नमूद केलेल्या पापडापैकी उपलब्ध असलेला कोणताही पापड तळून किंवा भाजून घ्यावा.
एका बाऊलमधे पापड कुसकरून घ्यावा.  मग त्यात कांदा, टॉमेटो, कोथिंबीर, चाट मसाला, तळलेले शेंगदाणो, मिरची पावडर, लिंबू रस आणि  मीठ घालून मिक्स करून  ‘ पापड चाट ’ पोटभर खावा.

ज्वारीच्या पिठाची आंबोळी
साहित्य : एक वाटी ज्वारीचं पीठ, अर्धा चमचा जिरे पावडर, पाव चमचा मीठ, पाव पेक्षा कमी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव वाटी ताक आणि आवश्यकतेनुसार पाणी.
कृती : खोलगट भांड्यात ज्वारीचं पीठ घेऊन त्यात जिरे पावडर, मीठ, कोथिंबीर घालून सर्व साहित्य एकत्र करावं.  मग त्यात ताक आणि  पाणी घालून मध्यम जाडसर पीठ तयार करून घ्यावं. तव्यावर तुप घालून  मिश्रण घालवं. गोलाकार किंवा हवा तसा आकार करून पहिली बाजू लालसर करु न घ्यावी आणि त्यावर झाकण ठेऊन पुन्हा तुप घालून दुसरी बाजू  वाफवून घ्यावी.
लोणच्या बरोबर गरमागरम ज्वारीच्या आंबोळी खावी.

( लेखिका लोकमतच्या मुंबई आवृत्तीत वार्ताहर आहेत.)

bhaktisoman@gmail.com

 

 


 

Web Title: in Lockdowns kids turns into kitchens .. How?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.