'Junk' ads on social media are gaining you weight! | सोशल मीडियातल्या ‘जंक’ जाहिराती तुमचं वजन वाढवताहेत, सांभाळा!

सोशल मीडियातल्या ‘जंक’ जाहिराती तुमचं वजन वाढवताहेत, सांभाळा!

ठळक मुद्देवजन वाढीचा परिणाम फक्त शारीरिक नाही मानसिकही असतोच.

सखी ऑनलाइन टीम

तुम्ही सोशल मीडियावर येता, अगदी सकाळी सकाळी आणि तिथे तुमच्या जवळच असलेल्या एखाद्या हॉटेलची जाहिरात तुम्हाला दिसते. किंवा तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींशी खाण्यापिण्याबद्दल बोलत असता आणि  लगेच तुमचा फोन तुम्हाला खाण्याच्या अनंत जागा दाखवायला लागतं. आपले फोन स्मार्ट तर आहेतच पण काही सव्र्हेनुसार सोशल मीडिया चुकीच्या खाण्याच्या सवयी निर्माण करतंच.
तुम्ही इंस्टाग्रामवर गेलात तर अन्नपदार्थांच्या कितीतरी पोस्ट बघायला मिळतात. पण त्यातल्या बहुतांशी जंक फूडच्या असतात. म्हणजेच सातत्याने जंक फूडच्या जाहिराती दिसत राहतात. त्याचा कळत नकळत मनावर परिणाम होतोच. जंक फूडचे टेम्पटिंग फोटो सतत बघितल्याने खाण्याची इच्छा होतेच. पण सतत जंक फूड खाल्ल्याने शारीरिक, भावनिक समस्या उद्भवू शकतात. 
खरंतर झटपट अन्न पदार्थ बनवण्याच्या, आरोग्यासाठी चांगल्या अशा कितीतरी रेसिपीज सहज मिळवण्याचं सोशल मीडिया हे महत्वाचं माध्यम आहे. 

सतत जंक फूडच्या जाहिराती बघितल्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयी झपाट्याने बदलत आहेत, जे नक्कीच हेल्दी नाही..


1. जरा विचार करुन पहा की, सतत मस्त चमचमीत खावं असं आताशा तुम्हाला नेहमी वाटतं का?
2. सकस अन्न नियमित घेतल्यावर कधीतरी जंक फूड खायला हरकत नसतेच. पण सतत जंक फूड खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होणार आहे हे लक्षात ठेवा. 
3. तुमचं वजन वाढू शकतं. वजन वाढलं कि त्यातून नैराश्य येऊ शकतं. 
4. नैराश्याचा परिणाम मानसिक, भावनीक, सामाजिक जीवनावर होतो. त्यामुळे सोशल मीडियाच्या स्क्र ोल्समध्ये कितीही टेम्पिटंग फूड अ‍ॅड्स, फूड रेसिपीज दिसत असल्या तरी त्या फक्त बघा. किंवा बघूही नका.
5. सतत जंक खाण्याची गरज नसते. आपल्या घरातून जे अन्न शिजवलं जातं तेच सगळ्यात हेल्दी असतं. त्याकडे तुमचं स्वतर्‍कडे आणि घरच्यांकडेही दुर्लक्ष होणार नाही

Web Title:  'Junk' ads on social media are gaining you weight!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.