Join us  

फौजी की बेटी ऐसी धाकड है! जागतिक चॅम्पियनशिप जिंकणारी प्रिया, कुस्तीत कमाल कर दिया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 3:10 PM

कुस्तीपटू प्रिया मलिकने गोल्ड मेडल जिंकलं... बस्स एवढंच आपल्याला कळलं. आता गोल्ड मेडल जिंकलं म्हणजे ऑलिम्पिकच असणार असं म्हणून अनेकांनी तिला धाडधाड शुभेच्छाही देऊन टाकल्या. पण ती कोण, कुठली, कोणती स्पर्धा जिंकली, याबद्दल कुणालाही अधिक जाणून घेण्याची गरज वाटली नाही. world wrestling championship मध्ये सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचणारी प्रियाही आपल्याच लोकांचे अज्ञान पाहून थक्क झाली.

ठळक मुद्देविशेष कौतूकाची बाब म्हणजे या स्पर्धेतील सर्व लढती प्रियाने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना एकही अंक न देता जिंकल्या आहेत.

क्रिकेट सोडून अन्य खेळांबाबत आणि खेळाडूंबाबत आपल्याला किती आस्था आहे, याचं नव्याने मिळालेलं हे एक उदाहरण. प्रिया मलिक.... हरियाणाची ही प्रिया एका मागे एक कुस्तीच्या स्पर्धा जिंकत गेली आणि तिने थेट हंगेरी येथे सुरू असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत धडक मारली तरी बहुसंख्य भारतीयांना तिच्या बाबतीत काहीच माहिती नव्हती. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत प्रियाने world wrestling championship जिंकली आहे. २२ तारखेलाच तिने ही कामगिरी केली. पण आपल्याला हा विजय दि. २५ रोजी समजला, हे आणखी एक दुर्दैव.

 

विशेष कौतूकाची बाब म्हणजे या स्पर्धेतील सर्व लढती प्रियाने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना एकही अंक न देता जिंकल्या आहेत. सर्व लढती शब्दश: एकहाती जिंकत प्रियाने रचलेला इतिहास खरोखरच अचंबित करणारा आहे. ७५ किलो वजनी गटात खेळत प्रियाने बेलारूसच्या कुस्तीपटूला ५-० ने पराभूत करत सुवर्णपदक आपल्या नावे केलं. स्पर्धेची पहिली खेळी प्रियाने चक्क १०- ० या फरकाने जिंकली होती.

प्रियाने या ही स्पर्धा जिंकल्याप्रिया मलिकने याआधी २०१९ साली पुण्यात झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेतही सुवर्णपदक पटकाविले होते. तसेच २०१९ मध्ये दिल्लीतील १७ व्या स्कूल गेम्समध्ये सुवर्णपदक आणि २०२० मध्ये पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय कॅडेट चँपियनशिपमध्येही सुवर्णपदक पटकाविले आहे.

 

ही प्रिया मलिक आहे तरी कोण?हरियाणाच्या जिंद जिल्ह्यातल्या निदानी या एका लहान गावातली आहे प्रिया. तिचे वडील जय भगवान निदान हे भारतीय लष्करातून हवालदार म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. सध्या ते शेती करतात. अंशू मलिक या प्रियाच्या प्रशिक्षक. आपले वडील आणि आजोबा  पृथ्वी सिंह यांनी आपल्याला कुस्ती खेळण्यास  नेहमीच प्रोत्साहन दिले, असे प्रिया नेहमीच सांगते. अंशू यांच्याकडे पाहूनच प्रियाचा खेळ बहरत गेला. निदानीच्या चौधरी भरत सिंह मेमोरिअल स्कूलमध्ये प्रिया शिकली. प्रियाच्या गावचे वैशिष्ट्य म्हणजे या गावात अनेक कुस्तीपटू आहेत. प्रियाचा भाऊ लष्करामध्ये कुस्ती प्रशिक्षक आहे. 

 

थोरामोठ्यांकडून कौतूकपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी या विजयश्रीनिमित्त प्रियाचे भरभरून कौतूक केले आहे. हरियाणाचे क्रिडामंत्री संदीप सिंग यांनीही “महिला कुस्तीपटू प्रिया मलिक या हरियाणाच्या सुपुत्रीने हंगेरी येथे आयोजित वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवल्यानिमित्त तिचे अभिनंदन.” असे ट्विट करत प्रियाला शुभेच्छा दिल्या आहेत. 

प्रिया म्हणते, तुमच्या शुभेच्छा खऱ्या होवो...प्रियाने स्पर्धा जिंकल्यावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. पण आपण ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकलो, अशा समजातून या शुभेच्छा आल्या आहेत, हे समजल्यावर प्रियाही आश्चर्यचकीत झाली. याबाबत ट्वीट करताना ती म्हणाली की तुमच्या शुभेच्छा खऱ्या ठरो आणि मी २०२४ साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई करो. मी कठोर परिश्रम करेल आणि भारतासाठी नक्कीच ऑलिम्पिकचे सुवर्ण पदक जिंकेल, असा विश्वासही तिने व्यक्त केला. 

 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीकुस्ती