Join us

फक्त ८० रुपये उसने घेऊन ७ महिलांनी सुरु केला व्यवसाय, आता बनलाय मोठा ब्रॅण्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2025 14:01 IST

The Story Of Lijjat Papad Journey : मनात आणलं तर एकत्र येऊन महिला किती मोठं काम करु शकतात याचं हा ब्रॅंड उदाहरणच आहे.

वर्क फ्रॉम होम ही कल्पना अस्तित्त्वात नसतानाची गोष्ट आहे. घराबाहेर जाता येत नाही. पैशांची गरज आहे. अशा परिस्थितीत सात गृहिणींनी घराबाहेर न जाता व्यवसाय सुरू करून दाखवतो अशा जिद्दीने एक छोटासा गृहउद्योग सुरू केला.(The Story Of Lijjat Papad Journey) थोडा घरखर्चाला हातभार म्हणून सुरू झालेला हा व्यवसाय भारतातील नामांकित ब्रँड बनेल असा विचारही त्यांनी केला नव्हता.१९५९ साली सात जणींनी मिळून श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड नावाचा गृहउद्योग सुरू केला. मुंबईत राहणाऱ्या या उद्योजक तेव्हा फक्त २० ते २५ वर्षांच्या होत्या.(The Story Of Lijjat Papad Journey) भारताला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं.(The Story Of Lijjat Papad Journey) अशात अनेक जण पैसे कमवण्यासाठी झटत होते. पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी मुलाबाळांना सोडून घराबाहेर जाणं शक्य नाही. जेवणाखेरीज काहीच करता येत नाही. आपण करणार तरी काय? अशा विचारांनी त्रस्त होऊन गप्पा मारत असताना या मैत्रिणींना एक कल्पना सुचली.

खाद्यपदार्थ बनवता येतात ना मग चला तेच विकू. घरगुती पापड बनवून विकूया, कामं वाटून घेऊ. कल्पना चर्चेतच न ठेवता प्रत्यक्षात उतरवत या महिलांनी पापड बनवायला सुरुवात देखील केली.पैसे नसल्याने त्यांनी छगनलाल परेख नावाच्या इसमाकडून ८० रुपये उसने घेतले.(The Story Of Lijjat Papad Journey) दुकानांमधून फिरून दुकानदारांना मनवले. काहींनी नकार दिला, काहींना दया आली. हळूहळू नाव मोठं झाले. अजून महिला उद्योगात सामील झाल्या. घरामध्ये बसून काम करा, आम्ही सामान पुरवतो. कामाचे स्वरूप असे असल्याने स्त्रियांनी घरच्या घरी पापड लाटून पैसे कमवले.

सात जणींपासून सुरू झालेला हा व्यवसाय आज ४५ हजाराहून अधिक महिलांच्या पैशापाण्याची सोय करत आहे. लिज्जत पापड भारतातील एक नामवंत व्यवसाय आहे. जो स्त्रियांनी सुरू केला आणि आता स्त्रियाच चालवतात. ८० रुपयांपासून सुरू झालेल्या या व्यवसायाचे आता वार्षिक उत्पन्न सुमारे १६०० कोटी आहे. म्हणून स्वतंत्र्योत्तर भारतात महिला उद्योजक म्हणून ओळख बनवणाऱ्या या सात जणींची गोष्ट नक्कीच प्रेरणादायी आहे.

टॅग्स :व्यवसायमहिलाअन्न