Join us  

वय झालं? मग गाणी म्हणा, नाचा.. धमाल करा! कोण म्हणतं म्हातारपणात जगू नये आनंदाने..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2024 8:00 AM

वयाने पन्नाशी-साठी गाठली म्हणून मन मारून न जगता सुरू केलेला एक खास उपक्रम.

ठळक मुद्देआपल्या मैत्रिणींच्या, ओळखीच्या महिलांना घेऊन असा बॅण्ड तयार करू शकतो असं पुलेस्टन यांना वाटलं.

माधुरी पेठकर

महिला, मग त्या कोणत्याही देशातल्या असल्या तरी त्यांच्यावर पहारा ठेवणाऱ्या, त्यांचं काय चुकतंय हे शोधणाऱ्या नजरा तेथील समाजात असतातच. वयाचं भान न ठेवता बायका जरा अलीकडे पलीकडे वागू लागल्या की त्यांच्या नावाने बोटं मोडणं, त्यांना नावं ठेवणे, टोमणे मारणे इतकंच नाही तर त्यांच्यावर कधीकधी फुल्यादेखील मारल्या जातात. वेगळं काही मनासारखं करावंसं वाटलं तरी बायकांना करता येतंच असं नाही. मात्र, ऑक्सफोर्ड शहरातील काही बायकांना मान्य नव्हतं. ५० ते ७७ या वयोगटातील तिथल्या काही महिलांनी एकत्र येत एक म्युझिक बॅण्ड सुरू केला.बासिस्ट डेब पुलेस्टन नावाच्या महिला या ऑक्सफर्ड शहरात राहतात. त्यांना प्रौढपणाचा विशिष्ट टप्पा गाठल्यानंतर चार पावलं मागे जाणाऱ्या, बाहेरचं जग सोडून आत आत राहणाऱ्या महिलांसारखं जगणं मान्य नव्हतं. वयाचा हिशोब न ठेवता आपण स्वत: आनंद घ्यायला हवा असं पुलेस्टन यांना कायम वाटायचं.

एकदा त्यांनी नाव आणि प्रसिद्धी नसलेल्या 'अ लिसेस्टर या एका प्रकल्पाविषयी ऐकलं. हा प्रकल्प उतारवयात ज्या बायकांना संगीत शिकायचंय, वाद्य वाजवायला, गाणी लिहायला, गाणी बसवायला शिकायचंय, ज्यांना म्युझिक बॅण्ड तयार करावासा वाटतो त्यांना मदत करतो. आपणही आपल्या वयाच्या, आपल्यापेक्षा जास्त वय असलेल्या आपल्या मैत्रिणींच्या, ओळखीच्या महिलांना घेऊन असा बॅण्ड तयार करू शकतो असं पुलेस्टन यांना वाटलं.

(Photo : BBC)त्यांनीही कल्पना आपल्या मैत्रिणींना सांगितली. त्यांनाही ती पटली. १०-१२ महिला एकत्र आल्या आणि त्यांना सोबत घेऊन पुलेस्टन यांनी ‘द हार्मोन्स’ ( The harMones) हा बॅण्ड तयार केला. एकत्र येऊन वाद्य शिकणं, गाणी लिहिणं, गाणी बसवणं, ताल-वाद्यांच्या मेळात ती म्हणणं असा त्यांचा सराव सुरू झाला. पुरेशी प्रॅक्टिस झाल्यावर पुलेस्टन आणि त्यांच्या बॅण्डने कार्यक्रम करायचं ठरवलं.

सुरुवातीला शहरातील कम्युनिटी फेस्टिव्हलसाठी द हार्मोन्स बॅण्ड कार्यक्रम करू लागला. नुकताच त्यांनी युवकांसाठी काम करणाऱ्या एका धर्मादाय प्रकल्पासाठी एक मोठा कार्यक्रम केला. समाजमाध्यमांत त्यांची मोठी चर्चा आहे

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टी